“..म्हणून मी करिअरसाठी क्रिकेट निवडलं नाही”; सैफने सांगितलं खरं कारण

अभिनेता सैफ अली खानने नुकतीच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला त्याच्या करिअर निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. सैफने क्रिकेटमध्ये का करिअर केलं नाही, असं कपिलने विचारलं असता त्याने यामागील खरं कारण सांगितलं आहे.

..म्हणून मी करिअरसाठी क्रिकेट निवडलं नाही; सैफने सांगितलं खरं कारण
Saif Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 9:12 AM

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सिझन गेल्या आठवड्यापासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे. शनिवारी या शोमध्ये ‘देवारा’ या चित्रपटाची टीम पोहोचली होती. अभिनेता सैफ अली खान, ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत कॉमेडियन कपिल शर्माने विविध मुद्द्यांवर गप्पा मारल्या. यावेळी सैफ आणि ज्युनियर एनटीआर त्यांच्या करिअर निवडीविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचं का ठरवलं, यामागचं कारण दोघांनी या शोमध्ये सांगितलं.

“तुझे वडील दिग्गज क्रिकेटर होते आणि आई इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार आहे, मग तू करिअर म्हणून अभिनयक्षेत्रच का निवडलंस”, असा सवाल कपिलने सैफला केला. त्यावर उत्तर देताना सैफ म्हणाला, “लोक म्हणायचे की क्रिकेट खेळण्याची मला माझ्या आईकडून वारसा म्हणून मिळाली. माझ्यात ते टागोर कुटुंबाकडून अनुवांशिकरित्या आलं. पण त्यासाठी गरजेचं असलेलं मानसिक स्थैर्य माझ्यात नव्हतं. त्यामुळे क्रिकेट मला फारसं भावलं नाही. माझ्या मते मी योग्य करिअर निवडलंय. मला अभिनय करण्यात खूप मजा येते.”

हे सुद्धा वाचा

क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रात सैफ अली खानच्या कुटुंबीयांचा मोठा इतिहास आहे. सैफने आई शर्मिला टागोर यांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. तर सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे टायगर पतौडी म्हणूनही ओळखले जायचे. ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. बीसीसीआयकडून त्यांचा सीके नायुडू लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला होता. सैफचे आजोबा इफ्तिखर अली खान पतौडी हे सुद्धा 1946 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते.

यावेळी ज्युनियर एनटीआरनेही अभिनयक्षेत्रात काम करण्याचं का निवडलं, यामागचं कारण सांगितलं. “माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी 17 वर्षांचा होतो. मला आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं. त्यामुळे मी कधी दुसरे कोणते पर्याय बघितलेच नाहीत. या करिअरच्या माध्यमातून मी असंख्य लोकांना भेटतोय. प्रतिभेची देवाणघेवाण होतेय. लोक जेव्हा बसून तुमच्या अभिनयाचा आनंद घेतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. अभिनेता बनून मी खूप खुश आहे. त्यामुळे मी माझ्या करिअरसंदर्भात योग्य निर्णय घेतलाय असं वाटतं”, असं तो म्हणाला.

नर्सेस 'लाडक्या बहिणी' नाहीत का? कुठे होतेय अनोखी बॅनरबाजीची चर्चा?
नर्सेस 'लाडक्या बहिणी' नाहीत का? कुठे होतेय अनोखी बॅनरबाजीची चर्चा?.
'श्रीमंतांची पदं सगळे घेतात, मी गरीब..', भरत गोगावले नेमक काय म्हणाले?
'श्रीमंतांची पदं सगळे घेतात, मी गरीब..', भरत गोगावले नेमक काय म्हणाले?.
स्वतःच्या हातून गोविंदाला गोळी लागल्यावर रुग्णालयातून शेअर केला ऑडिओ
स्वतःच्या हातून गोविंदाला गोळी लागल्यावर रुग्णालयातून शेअर केला ऑडिओ.
अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, स्वतःच्या हातून बंदुकीतून सुटली गोळी
अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, स्वतःच्या हातून बंदुकीतून सुटली गोळी.
अर्ज 'लाडक्या बहिणीं'चे अन् कागदपत्र भावांचे... पैसे घेतले तिसऱ्यानेच
अर्ज 'लाडक्या बहिणीं'चे अन् कागदपत्र भावांचे... पैसे घेतले तिसऱ्यानेच.
नितीन गडकरींच्या 'लाडकी बहिणी'च्या वक्तव्यानं महायुती सरकारचीच कोंडी?
नितीन गडकरींच्या 'लाडकी बहिणी'च्या वक्तव्यानं महायुती सरकारचीच कोंडी?.
दादा-भाजपला धक्का देणार! पक्षात मोठी इन्कमिंग होणार, पवार काय म्हणाले?
दादा-भाजपला धक्का देणार! पक्षात मोठी इन्कमिंग होणार, पवार काय म्हणाले?.
शरद पवार यांचं सरकार येणार? अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले शरद पवार
शरद पवार यांचं सरकार येणार? अनौपचारिक गप्पांमध्ये काय म्हणाले शरद पवार.
'दीड-दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'दीड-दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय.