सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमने लावले ‘जय श्री राम’चे नारे, म्हणाला, ‘पापा को फोन करो…’

Saif Ali Khan son Ibrahim Ali Khan: 'जय श्री राम'चे नारे लावत सैफ अली खान याचा मुलगा म्हणाला, 'पापा को फोन करो...', व्हिडीओ पाहून म्हणाल..., सध्या सोशल मीडियावर इब्राहिम अली खान याचा व्हिडीओ होतोय व्हायरल...

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमने लावले 'जय श्री राम'चे नारे, म्हणाला, 'पापा को फोन करो...'
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 1:08 PM

Saif Ali Khan son Ibrahim Ali Khan: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सैफ याची कार्बन कॉपी म्हणून देखील इब्राहिम याची ओळख आहे. इब्राहिम दिसताच त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींची गर्दी जमते. पण शनिवारी इब्राहिम याचा वेगळा अंदाज चाहत्यांच्या समोर आला. सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इब्राहिम ‘जय श्री राम’चे नारे देताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये इब्राहिम कारमध्ये बसलेला दिसत. तेव्हा पैसे मागण्यासाठी काही गरजू लोकं इब्राहिमच्या भोवती जमा होतात. तेव्हा एक गरजू व्यक्ती इब्राहिमला म्हणतो, ‘5 रुपयांनी काय होतं?’ यावर इब्राहिम म्हणतो, ‘काय यार आता… 5 रुपयांनी काही होणार नाही, पण व्हायला देखील पाहिजे… माझ्या वडिलांना फोन करा… जय श्री राम…’ असं इब्राहिम म्हणाला.

सध्या सोशल मीडियावर इब्राहिमचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तर नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी इब्राहिमला म्हणाला, ‘बडे दिलवाला…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हा तर वेगळाच आहे…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘जय श्री राम… भाईने दिल जीत लिया…’ व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना इब्राहिम कौतुक केलं तर अनेकांनी इब्राहिमला ट्रोल देखील केलं.

इब्राहिम अली खान याचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच ‘सरजमीन’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी बोमन ईराणी यांच्यावर आहे. सिनेमात इब्राहिम याच्यासोबत अभिनेत्री काजोल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील इब्राहिमच्या पहिल्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

इब्राहिम अली खान – पलक तिवारी

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत आहेत… अशा चर्चा कायम सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. इब्राहिम अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यावर पलक हिने स्वतःची भूमिका देखील मांडली. आम्ही चांगले मित्र आहोत असं अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती. पलक सध्या बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.