इब्राहिम कधीच मला..; मुलाबद्दल सैफ अली खानने व्यक्त केली खंत

अभिनेता सैफ अली खानने नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात सैफला त्याच्या मुलांविषयी प्रश्न विचारण्यात आला. मुलगा इब्राहिम आणि मुलगी सारा हे कधी तुझ्याकडून करिअरविषयी सल्ला विचारतात का, असं कपिलने विचारलं.

इब्राहिम कधीच मला..; मुलाबद्दल सैफ अली खानने व्यक्त केली खंत
Saif Ali Khan with IbrahimImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 12:04 PM

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सिझन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ‘देवारा’ या चित्रपटातील कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते. अभिनेता सैफ अली खान, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्यासोबत कॉमेडियन कपिल शर्माने विविध मुद्द्यांवरून गप्पा मारल्या. विनोदाने परिपूर्ण असलेल्या या एपिसोडमध्ये कपिलने सैफ अली खानला त्याच्या मुलांविषयी प्रश्न विचारला. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे करिअर आणि अभिनयाच्या संदर्भात तुझ्याकडून कोणता सल्ला घेतात का, असं कपिलने विचारलं. सारा आणि इब्राहिम ही सैफ आणि अमृता सिंगची मुलं आहेत. साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तर इब्राहिमसुद्धा लवकरच इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे.

कपिलच्या प्रश्नाचं उत्तर देताना सैफने इब्राहिमच्या बॉलिवूड पदार्पणाचीही हिंट दिली. तो म्हणाला, “इब्राहिमने आता कुठे सुरुवात केली आहे. त्याचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे तो मला फारसं काही विचारत नाही. पण माझी मुलगी सारा आणि मी खूप गप्पा मारतो. ती माझ्याकडून सल्ले घेतच असते. ती अनेकदा माझ्याकडे सीन्स घेऊन येते आणि मला तिच्यासोबत वाचायला सांगते. त्यावर माझ्या कल्पनाही विचारून घेत असते. पण कदाचित भविष्यात मी हे सर्व इब्राहिमसोबतही करेन.”

हे सुद्धा वाचा

कपिलच्या शोमध्ये परीक्षक म्हणून असलेली अभिनेत्री अर्चना पुरण सिंह लगेच इब्राहिमच्या पदार्पणाविषयी व्यक्त होते. मी नुकच्याच एका चित्रपटा इब्राहिमसोबत काम केलंय, असं ती सांगते. त्याचप्रमाणे ती इब्राहिमच्या स्वभावाचंही कौतुक करते. “मी नुकतंच त्याच्यासोबत एका चित्रपटात काम केलंय आणि मी हे आवर्जून सांगू इच्छिते की या संपूर्ण जगातील तो सर्वांत गोड मुलगा आहे. त्याचं संगोपन खूप चांगलं झालं आहे”, असं अर्चना म्हणते. हे ऐकून सैफलाही आनंद होतो. तो म्हणतो, “मला हे ऐकून खूप आनंद झाला.”

इब्राहिम अली खान लवकरच ‘सरजमीन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं कळतंय. यामध्ये त्याच्यासोबत काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन कायोजे इरानी यांनी केलंय. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.