सैफ अली खानने परदेशी महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तेव्हा…, धक्कादायक सत्य
Saif Ali Khan Love Life: दोन मुलांचा बाबा, बायकोला दिला घटस्फोट, सत्य लपवून सैफ अली खान याने परदेशी महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं तेव्हा..., आता कुठे आणि काय करते की महिला? धक्कादायक आहे सत्य, सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचा घटस्फोट अभिनेत्री करीना कपूर हिच्यामुळे झाला.. असं अनेक जण म्हणतात. पण सैफ आणि अमृता याचं घटस्फोट करीना कपूर नाही तर, एका परदेशी महिलेमुळे झालं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. ही महिला दिसरी तिसरी कोणी नसून इटालियन मॉडेलमुळे रोझा कॅटालानो होता. लग्न झालेलं असताना सैफच्या आयुष्यात रोजा कॅटालानो नावाच्या इटालियन मॉडेलची एन्ट्री झाली होती. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगू लागल्या.
जवळपास दोन वर्ष रोझा आणि सैफ यांनी एकमेकांना डेट केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. यावर रोझा हिला एका मुलाखतीत विचारण्यात देखील आलं होतं. सांगायचं झालं तर, अमृता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ याच्या आयुष्यात मॉडेल रोझा हिची एन्ट्री झाली. रोझा – सैफ यांना अनेक अवॉर्ड शो आणि कर्यक्रमांमध्ये देखील एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दोन वर्ष रोझा हिला डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. रोझा हिच्यानंतर सैफच्या आयुष्यात करीनाची एन्ट्री झाली.




रोझा एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘सैफ आणि माझी ओळख एका शोमध्ये झाली होती. पहिल्या नजरेतच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो… त्यानंतर मला सैफबद्दल हळू – हळू गोष्टी कळू लागल्या… सैफ विवाहित आहे. त्याला दोन मुलं आहेत. मला काहीही महिती नव्हतं. जेव्हा मी भारतात आली, तेव्हा सैफ दुसरीकडे कुठे राहात होता आणि त्याचं घटस्फोट झालं होतं…’
‘सैफ विवाहित आहे आणि त्याला दोन मुलं आहेत… कळल्यानंतर मला फार मोठा धक्का बसला…’ असं देखील रोझा म्हणाली होता. आज त्या गोष्टीला अनेक वर्ष झाली आहेत. पण रोझा आता कुठे आहे आणि काय करते? याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही.
रोझा आयुष्यातून गेल्यानंतर सैफ याच्या आयुष्यात करीना हिची एन्ट्री झाली. 2012 मध्ये सैफ आणि करीना यांनी लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेता कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. ‘टशन’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सैफ आणि करीना यांच्यातील मैत्री वाढली.
सैफ – करीना यांना दोन मुलं देखील आहेत. तैमूर अली खान आणि जेह अली खान… अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत. करीना कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.