“माझ्या आईबहिणीचा अपमान, मुलांना भेटू दिलं नाही..”; अमृतासोबत घटस्फोटानंतर सैफने व्यक्त केलं होतं दु:ख

लग्नाच्या 13 वर्षांनंतर अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह विभक्त झाले. घटस्फोटानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सैफ त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. या मुलाखतीत त्याने पूर्व पत्नी अमृतावर अनेक आरोप केले होते.

माझ्या आईबहिणीचा अपमान, मुलांना भेटू दिलं नाही..; अमृतासोबत घटस्फोटानंतर सैफने व्यक्त केलं होतं दु:ख
Saif Ali Khan and Amrita SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 10:51 AM

अभिनेता सैफ अली खानने वयाच्या 21 व्या वर्षी अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केलं होतं. अमृता सैफपेक्षा वयाने सहा वर्षांनी मोठी आहे. 1991 मध्ये या दोघांनी लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. मात्र लग्नाच्या 13 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर सैफ एका मुलाखतीत पोटगीच्या विषयावर मोकळेपणे व्यक्त झाला होता. तो म्हणाला कमावलेला सर्व पैसा त्याच्या मुलांसाठी पाठवला जात होता. इतकंच नव्हे तर मला घरातून काढून टाकण्यात आलं होतं, असाही आरोप त्याने केला होता. त्या घरात अमृता आणि तिचे नातेवाईक राहू लागले होते.

2005 मध्ये ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “मला पोटगी म्हणून अमृताला पाच कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यापैकी अर्धे म्हणजेच अडीच कोटी रुपयांपर्यंत मी तिला आधीच दिले आहेत. त्याचसोबत माझा मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत त्याला दर महिन्याला एक लाख रुपये द्यायचे आहेत. मी शाहरुख खान नाहीये. माझ्याकडे एवढा पैसाही नाही. उरलेले पैसे मी नक्की देईन, असं तिला वचन दिलं आहे. त्यासाठी मला मरेपर्यंत कष्ट करावे लागले तरी चालेल. जाहिराती, स्टेज शोज आणि चित्रपट यांमधून मी जो काही पैसा कमवत होतो, ते सर्व माझ्या मुलांना देतोय. माझ्याकडे काहीच पैसा शिल्लक राहत नाही. आमचा बंगला हा अमृता आणि मुलांसाठी आहे. त्यात मी गेल्यानंतर तिचे नातेवाईकसुद्धा राहू लागले आहेत.”

हे सुद्धा वाचा

मी किती वाईट पती आणि किती वाईट पिता आहे यावरून मला सतत टोमणे मारले जात होते, असंही सैफ म्हणाला होता. “मी माझ्या मुलांना भेटू शकत नाही. त्यांनाही मला भेटण्याची, माझ्यासोबत राहण्याची परवानगी नव्हती. माझ्या वॉलेटमध्ये मुलगा इब्राहिमचा फोटो आहे. जेव्हा जेव्हा मी तो फोटो पाहतो, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू येतात. मला प्रत्येक वेळी मुलगी साराची आठवण येते”, अशा शब्दांत त्याने दु:ख व्यक्त केलं होतं.

“मी किती नालायक आहे, हा टोमणा मला सतत ऐकावा लागतोय. सतत असा अपमान सहन करणं सोपं नाही. तुमच्या आई आणि बहिणीचाही अपमान केला जातो. मी या सर्वांमधून गेलोय”, असं सैफ म्हणाला होता. अमृतासोबत सैफच्या लग्नाला त्याची आई शर्मिला टागोर यांचा स्पष्ट विरोध होता. त्यामुळे जेव्हा सैफने लग्नाविषयी सांगितलं, तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला होता.

Non Stop LIVE Update
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.