लग्न न करता अभिनेत्री झाली आई ; चार वर्षांनंतर आता अशी दिसते लेक… पाहा व्हिडीओ
लग्न न करता २०१८ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई ; चार वर्षांनंतर लेकीसोबत 'या' ठिकाणी दिसली अभिनेत्री... सोशल मीडियावर दोघींचा व्हिडीओ तुफान व्हायरल...
मुंबई : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नापूर्वी मुलांना जन्म दिला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे साक्षी तन्वर. साक्षी लग्नापूर्वीच एका गोंडस मुलीची आई झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे साक्षीने लग्न करताच एका गोंडस मुलीला दत्तक घेतलं आहे. मुलीला दत्तक घेतल्यानंतर साक्षी तुफान चर्चेत आली. साक्षी हिने २०१८ मध्ये मुलीला दत्तक घेतलं. साक्षीने तिच्या लेकीचं नाव दित्या (Dityaa) असं आहे. कुटुंब आणि मित्र परिवाराचा पाठिंबा असल्यामुळे एका मुलीला दत्तक घेवू शकली, असं वक्तव्य अभिनेत्रीने एका मुलाखतीत केलं.
जेव्हा साक्षीने दित्या हिला दत्तक घेतलं, तेव्हा अभिनेत्रीच्या फॅनपेजवर दोघींचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. २०१८ मध्ये जेव्हा लेकीसोबत साक्षीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला, तेव्हा दोघींचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता पुन्हा साक्षी लेकीमुळे चर्चेच आली आहे.
Admit it this pic gives u goosebums #SakshiTanwar pic.twitter.com/pCnOi9JuTc
— Sakshi Tanwar Fan (@Sakshifan123) October 20, 2018
नुकताच, साक्षी एकता कपूर (Ekta Kapoor) हिचा मुलगा रवी कपूर (Ravie Kapoor) च्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मुलीसोबत पोहोचली होती. साक्षीची लेक आता मोठी झाली आहे. पार्टीमध्ये दित्या लाल रंगाच्या फ्रॉकमध्ये प्रचंड गोंडस दिसत होती. साक्षीने लेकीसोबत पापाराझींना पोज दिल्या. तेव्हा आई-लेकीच्या नात्यात असलेला गोडवा सर्वांसमोर आला.
View this post on Instagram
साक्षी तन्वर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं वयाच्या ५० व्या वर्षी देखील तिने लग्न केलेलं नाही. २०१५ मध्ये साक्षीचं नाव समीर कोचर याच्यासोबत जोडण्यात आलं. पण रंगणाऱ्या चर्चांना अफवा असल्याचं सांगत अभिनेत्री सिंगल असल्याचं सांगितलं. एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.
साक्षी म्हणाली, ‘मी अद्यापही सिंगल आहे. कारण आतापर्यंत मला हवा तसा पार्टनर भेटलेला नाही आणि मी स्वतः प्रेमावर विश्वास ठेवत नाही…’ साक्षी तन्वर टेलिव्हीजन क्विन आहे. आतापर्यंत साक्षीने अनेक मालिकांमध्ये काम केलं. ज्यामुळे तिला लोकप्रियता देखील मिळाली.
साक्षी तन्वर ‘कहानी घर घर की’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ प्रसिद्धीझोतात आली. फक्त मालिकांमध्येच नाही तर, साक्षी हिने सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. अभिनेता आमिर खान स्टारर ‘दंगल’ सिनेमा आणि ‘माई’ वेब सीरिजमध्ये साक्षी मुख्य भूमिकेत दिसली.