आज काम करा 3 महिन्यांनंतर पैसे मिळतील? सेलिब्रिटींना कसे मिळतात त्यांचे पैसे? कठीण आहे प्रवास

Bollywood : सलमान खान, शाहरुख खान, करीना कपूर... यांसारख्या सेलिब्रिटींना कसे मिळतात त्यांच्या कामाचे पैसे? महिन्याच्या 1 तारखेला नाही तर, कठीण असतं सेलिब्रिटींचं सॅलरी स्ट्रक्चर... इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना कसे मिळतात पैसे?

आज काम करा 3 महिन्यांनंतर पैसे मिळतील? सेलिब्रिटींना कसे मिळतात त्यांचे पैसे? कठीण आहे प्रवास
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 1:48 PM

Bollywood : प्रत्येक व्यक्ती महिन्याच्या 1 तारखेच्या प्रतीक्षेत पूर्ण महिना मेहनत करत असतो. पण तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे तीन महिन्यांनंतर मिळणार असतील तर? विचार करुनच विचित्र वाटेल. कारण संपूर्ण घराचा खर्च महिन्याच्या 1 तारखेला येणाऱ्या पगारावर अवलंबून असतो. पण इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं सॅलरी स्ट्रक्चर फार वेगळं असतं. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मालिकांमध्ये काम करणारे कलाकार, दिग्दर्शक, सिनेमेटोग्राफर सर्वांना तीन महिन्यांनंतर कामाचे पैसे मिळतात. आज जाणून घेऊ कसं असतं इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं सॅलरी स्ट्रक्चर…

सांगायचं झालं तर, शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, दीपिका पादुकोन यांसारखे कलाकार त्यांच्या सिनेमांसाठी एक ठराविक मानधन घेतात. पण कलाविश्वात दिवसावर काम करणाऱ्या कलाकारांची संख्या देखील फार मोठी आहे. सहाय्यक कलाकार किंवा पडद्यावर दिसणाऱ्या छोट्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना दिवसाचे पैसे दिले जातात.

कोणत्याही सिनेमासाठी किंवा मालिकेसाठी अतिरिक्त कलाकार पुरवण्याची जबाबदारी ‘कॉन्ट्रॅक्टर’ची असते. अशा कलाकारांचं काम फक्त 1-2 दिवसांचे असते. या अतिरिक्त कलाकारांना ताबडतोब त्यांच्या कामाचं मानधन दिलं जातं. पण अतिरिक्त कलाकारांशिवाय इतर महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी तीन महिन्यांनंतर त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो. एवढंच नाही तर, त्यांचा टीडीएस देखील कापला जातो.

टीव्ही इंडस्ट्रीबद्दल सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन, सलमान खान, प्रत्येकाला ‘पर डे’नुसार मानधन दिलं जातं. पण त्यांना पगारासाठी 3 महिने प्रतीक्षा करावी लागते. केवळ अभिनेतेच नाही तर दिग्दर्शक, कॅमेरा ऑपरेटर, सिनेमॅटोग्राफर, एडिटर अशा सर्व लोकांना जे प्रोजेक्टनुसार प्रोडक्शनमध्ये काम करतात, त्यांना 3 महिन्यांच्या कामानंतर पगार दिला जातो.

‘या’ लोकांना मिळतं तात्काळ वेतन

अतिरिक्त कलाकारांशिवाय 500 ते 2000 हजार रुपयांपर्यंत काम करणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी असते. ज्यामध्ये लाईटमॅन, मजदूर यांना त्यांचं काम संपताच पैसे दिले जातात. कारण प्रॉडक्शन हाऊसच्या गरजेनुसार लाईटमॅन, मजदूर यांना कामावर ठेवण्यात येतं. म्हणून त्यांना काम संपल्यावर वेतन दिलं जातं.

‘या’ लोकांना मिळतं महिन्याचं मानधन

प्रॉडक्शन हाऊसमध्ये अनेक लोक काम करत असतात. जे ऑफिसमध्ये काम करतात. त्यांना महिन्याला मानधन मिळतं. पगारी कर्मचाऱ्यांमध्ये जनसंपर्क अधिकारी, क्रिएटिव्ह डायरेक्टर, लेखक आणि पीआर यांचाही समावेश होतो.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.