काळवीट शिकार प्रकरणी गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर अभिनेता सलमान खान आहे. तर ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कनेक्शन देखील सलमान खानशी जोडलं जात आहे. यावर सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी मोठा खुलासा केला असून करण्यात येत असलेले दावे देखील फेटाळून लावले आहेत. ‘माझ्या मुलाने कधी झुरळ देखील मारला नाही. तो एका प्राण्याची हत्या कशी करेल. त्याची चुकी नसताना तो माफी का मागेल… सलमान तर प्राण्यांवर प्रेम करतो.’ असं सलीम खान म्हणाले.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि सलमान खान कनेक्शन यावर सलीम खान म्हणाले, ‘बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सलमान खानशी काहीही संबंध नाही. लॉरेन्स बिश्नोई याने हत्येची जबाबदारी स्वीकारली असली तरी सलमानचं काहीही कनेक्शन नाही ही गोष्ट कुटुंबाला माहिती आहे.’ सलीम खान यांच्यानुसार, संपत्तीचे वाद असल्यामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली.
‘मी कधी कोणत्या प्राण्याला मारलं आहे आणि सलमानने कधी कोणत्या प्राण्याला मारलं आहे. सलमानने कधी झुरळ देखील मारलं नाही. याप्रकरणी मी सलमानला विचारलं, तो म्हणाला, घटना घडली तेव्ही मी तिकडे मी नव्हतो. मा कारमध्ये देखील मी नव्हतो. तो कधीच माझ्यासोबत खोटं बोलणार नाही. आम्ही तर बंदुकीचा देखील वापर करत नाही…’ असं सलीम खान म्हणाले.
‘जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टी देवावर आधारलेल्या आहे. हे कुराण शरीफमध्ये आहे – सन्मान, अपमान, जीवन आणि मृत्यू माझ्या हातात आहे.’ असं सलीम खान म्हणाले.
‘जीवावर आणि मृत्यू त्यांच्या हातात आहे तर बघू… आणि सलमानची काही चूक नसेल तर तो का माफी मागेल. माफी कधी मागतात जेव्हा तुम्ही काही चुकीचं केलं आहे. तुम्ही कोणाची फसवणूक केली आहे कोणाला दुःख पोहोचवलं आहे, त्रास दिला आहे… असं असेल तर माफी मागायला काहीही हरकत नाही.’
सलीम खान म्हणाले, ‘पोलिसांनी आम्हाला घराच्या काही भागात बसण्यास मनाई केली आहे. पूर्वी मी ज्या ठिकाणी बसायचो त्या ठिकाणी पोलिसांनी मला स्पष्टपणे रोखलं आहे कारण त्याच एका भागात एक गोळीबार देखील झाला आहे. आता प्रकरण मिटवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली जात आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं हे खंडणीचं प्रकरण आहे… असं देखील सलीम खान म्हणाले.