Salim Khan : अरबाज याने का केलं दुसरं लग्न? वडील सलीम खान यांनी सोडलं मौन
Salim Khan : वयाच्या 57 व्या वर्षी अरबाज खान याने का केलं दुसरं लग्न? वडील सलीम खान केलेलं वक्तव्य थक्क करणारं..., गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अरबाज खान आणि शूरा खान यांच्या लग्नाची चर्चा...
मुंबई | 27 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खान याने वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. अरबाज याने मेकअर आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलंय. दोघांच्या लग्नासाठी संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होतं. अरबाज खान याचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान देखील लेकाच्या दुसऱ्या लग्नात उपस्थित होते. लग्नानंतर सलीम खान यांनी लेकाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सलीम खान यांच्या वक्तव्याची चर्चा आहे. दुसरं लग्न करणं कोणता गुन्हा नाही… असं म्हणत सलीन खान यांनी अरबाज याच्या निर्णयाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सलीम खान म्हणाले, ‘दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला नाही वाटत यामध्ये कोणतं पाप आहे. दोघांसाठी मी आनंदी आहे. नव्या वधू-वराला मी आशीर्वाद दिले आहेत’ पुढे सलीम खान यांना लग्नाबद्दल तुमच्यासोबत काही चर्चा झाली? यावर लेखक म्हणाले, ‘मला नाही वाटतं चर्चा करण्याची काहीही गरज आहे. दोघे देखील शिक्षित आणि परिपक्व आहेत. त्यांचे निर्णय ते स्वतः घेऊ शकतात….’
पुढे सलीम खान म्हणाले, ‘मुलाचा आनंद माझ्यासाठी अधीक महत्त्वाचा आहे. जर तो आनंदी आहे, तर माझ्यासाठी दुसरं काहीही महत्त्वाचं नाही. त्याने फक्त सांगितलं, मी लग्न करत आहे आणि म्हणालो ठीक आहे…’ कोणाच्या आयुष्यात आपण सतत मध्यस्ती केली तर, यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात…. असं सलीम खान यांचं म्हणणं आहे.
अरबाज खान – शूरा खान
मीडिया रिपोर्टनुसार, शौरा खान आणि अरबाज खान यांची ओळख आगामी ‘पटना शुक्ला’ सिनेमाच्या सेटवर झाली. पहिल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाल्याची चर्चा रंगली. अखेर बहीण अर्पिता हिच्या घरी अरबाज आणि शूरा यांना निकाह मोठ्या थाटात पार पडला..
अरबाज खान – मलायका अरोरा
अरबाज खान याचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत झालं होतं. दोघांना एक 21 वर्षांचा मुलगा दोखील आहे. लग्नाच्या 19 वर्षांनंतर अरबाज आणि मलायका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सांगायचं झालं तर, अरबाज याच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहान खान देखील उपस्थित होता.