“हेलनशी लग्न करण्याचा निर्णय तडकाफडकी..”; सलीम खान काय म्हणाले?

हेलनसुद्धा त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. हेलन यांनी सलीम यांच्याशी लग्न केलं, मात्र त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी ठरल्या. त्याआधी सलीम यांनी सुशीला चरक यांच्याशी निकाह केला होता. पाच वर्षे डेट केल्यानंतर 1964 मध्ये सलीम यांनी सुशीला यांच्याशी लग्न केलं होतं.

हेलनशी लग्न करण्याचा निर्णय तडकाफडकी..; सलीम खान काय म्हणाले?
सलमा आणि सलमान खान, सलीम खान आणि हेलनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 1:07 PM

अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र हेलन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय काही ‘तडकाफडकी’ नव्हता, असं सलीम खान सांगतात. हेलन यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं, हे त्यांनी आधी कुटुंबीयांना सांगितलं होतं. पहिली पत्नी सलमा आणि चारही मुलांना याबद्दलची माहिती होती. सलीम आणि सलमा यांनी 1964 मध्ये लग्न केलं. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. एका मुलाखतीत सलीम खान हे त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

“माझ्या विवाहित आयुष्यात भ्रमनिरास झाला म्हणून किंवा मी त्रस्त होतो म्हणून हेलनशी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला न्वहता. हेलनशी लग्न करण्याचा निर्णय काही तडकाफडकी घेण्यात आला नव्हता. मी खूप वेळ घेतला होता. माझ्या आयुष्यात हेलन आहे, हे सलमाला सांगणारी पहिली व्यक्ती मीच होतो. दुसऱ्या कोणाकडून किंवा गॉसिप मॅगझिनमधून समजण्याआधीच मी तिला सत्य सांगितलं होतं”, असं सलीम खान म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हेलन यांच्या नात्याबद्दल सांगितल्यानंतर मुलांची काय प्रतिक्रिया होती, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, “त्यावेळी मुलं लहान होती, त्यामुळे त्यांच्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता. मुलं नेहमीच आईच्या बाजूने असतात आणि संपूर्ण परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळण्याचं श्रेय मी सलमाला देतो. जेव्हा मी तिला हेलनविषयी सांगितलं, तेव्हा अर्थातच तिने माझं कौतुक केलं नाही. साहजिकच आमच्यात काही वाद झाले, पण ते काही वेळापुरतेच होते. ठराविक वेळेनंतर सर्व गोष्टी स्वीकारल्या गेल्या. माझ्या मुलांना मी त्यावेळी सांगितलं होतं की, कदाचित ही गोष्ट तुम्हाला आता समजणार नाही, पण मोठं झाल्यावर तुम्ही मला समजू शकाल. लग्नानंतरही मी त्यांना हेच स्पष्ट केलं की, हेलनला तुम्ही तुमच्या आईइतकंच प्रेम करावं अशी माझी अपेक्षा नाही. पण तिला तुम्ही तितकाच आदर द्या.”

आजही सलीम खान, सलमा, हेलन आणि अभिनेता सलमान खान हे मुंबईतील वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’मध्ये एकत्र राहतात. सलीम आणि हेलन यांनी अर्पिताला दत्तक घेतलं. तिने आयुष शर्माशी लग्न केलं असून आयुषसुद्धा चित्रपटसृष्टीत काम करतोय.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.