Salman Khan : सलमानला ‘त्या’ अवस्थेत पाहून आईला कोसळलेलं रडू, सलीम खान यांनी सांगितला इमोशनल किस्सा
Salman Khan : सलमान खानचे वाढलेले केस, वाढलेली दाढी, भाईजानच्या डोळ्यात पाणी... जेव्हा मुलाची अशी अवस्था पाहून अभिनेत्याच्या आईला कोसळलेलं रडू, सलीम खान यांनी सांगितला इमोशनल किस्सा... भाईजान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...
स्क्रिनरायटर आणि अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांची 2019 मधील एक मुलाखत सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीत सलीम खान यांनी मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. विशेषतः सलमान खान याच्याबद्दल सलीम खान यांनी अनेक खुलासे केले. जेव्हा हिट एन्ड रन केसमध्ये सलमान खान याला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं… त्या दिवसांच्या आठवणी सांगत असताना सलीम खान देखील भावूक झाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलीम खान आणि सलमान खान यांची चर्चा रंगली आहे.
सलमान खान याच्याबद्दल सलीम खान म्हणाले. ‘अपघाताच्या केसमध्ये सलमान खान याला 18 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. जामीन मंजून होईपर्यंत 18 दिवस सलमान खान तुरुंगात होता. मुलाला जर शिक्षा होत असले तर, आईला किती दुःख होतं… याची तरतूद काद्यात करण्यात आलेली नाही. त्यासाठी काय?’
‘आई – वडिलांना दुःख होत असेल तर, मुलाला शिक्षा व्हायला नको… अशी तरतूद कायद्यात करण्यात आलेली नाही. सलमान तुरुंगात असताना आम्हाला पाणी पिताना देखील वाईट वाटत होतं. रात्री झोपताना आम्ही एसी लावला नव्हता. कारण त्याला फक्त एका चादरीवर झोपावं लागत होतं… तेथे कोणता पंखा देखील नव्हता…’
‘कैदी नंतर 343… जेव्हा मी जोधपूर येथे गेलो. तेव्हा कैद्यांबद्दल बोलत होतो. लोकांनी मला सांगितलं, तुम्हाला बसा… त्यानंतर ते बोलू लागले जा कैदी नंबर 343 ला घेवून या. आम्हाला कैदी नंबर 343 काय आहे माहिती नव्हतं. अखेर कैदी नंबर 343 आमच्या समोर आला आणि तो सलमान होता…’
‘लांब वाढलेले केस, दाढी… मी सलमा हिला सांगितलं होतं, बिलकूल रडू नकोस म्हणून, ती आई आहे, मुलाला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर आईला दुःख होणारच… सलमानला पाहिल्यानंतर सलमा प्रचंड रडू लागली. तेव्हा सलमानच्या डोळ्यात देखील पाणी होतं. त्याने आम्हाला खूप त्रास दिला आहे… अशी भावना सलमानच्या मनात होती…’ असं म्हणत सलीम खान यांनी सलमान खान तुरुंगात असताना घरातील वातावरण कसं होत.. याबद्दल सांगितलं.
सांगायचं झालं तर, सलमान खान अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेकदा भाईजानला जीवेमारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार देखील करण्यात आला. या घटनेची पोलीस सध्या चौकशी करत आहेत.