Salman Khan च्या ‘या’ अभिनेत्रीचं दाऊद इब्राहिमच्या शुटरसोबत खास कनेक्शन, अनेक वर्षांनंतर तिच्याबद्दलमोठी माहिती समोर

Salman Khan | दाऊद इब्राहिमच्या शुटरसोबत असलेल्या कनेक्शनमुळे सलमान खान याची अभिनेत्री झाली होती उद्ध्वस्त; आता तिच्यासाठी भाईजानने उचललं मोठं पाऊल! कोण आहे 'ती' अभिनेत्री? जिची सर्वत्र रंगतेय चर्चा... तिच्यासाठी काय करणार सलमान खान?

Salman Khan च्या 'या' अभिनेत्रीचं दाऊद इब्राहिमच्या शुटरसोबत खास कनेक्शन, अनेक वर्षांनंतर तिच्याबद्दलमोठी माहिती समोर
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 11:03 AM

मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | अभिनेता सलमान खान याच्यासोबत आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी स्क्रिन शेअर केली आहे. सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सलमान खान याच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्री आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. तर काही अभिनेत्रींनी मात्र बॉलिवूडचा निरोप घेतला. एवढंच नाही तर, सलमान खान याच्या काही अभिनेत्री अचानक बॉलिवूडमधून गायब झाल्या. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली. पण अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. भाईजान याची एक अभिनेत्री अशी आहे, जिचे संबंध थेट अंडरवर्ल्डसोबत असल्याचं समोर आलं. तेव्हापासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दिसलीच नाही. पण आता तिच्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. त्यामुळे अभिनेत्रीसोबत पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सध्या सलमान खान याच्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ममता कुलकर्णी आहे. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर ममता कुलकर्णी राज्य करत होती. पण अचानक अभिनेत्री गायब झाली. ममता आता ‘बिग बॉस १७’ मध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे. ‘बिग बॉस १७’ शोच्या निर्मात्यांनी ममता हिला शोसाठी विचारलं असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे. ९० च्या दशकात ममता कुलकर्णी हिने एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान स्टारर ‘करण अर्जुन’ सिनेमामुळे ममता कुलकर्णी हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली…

हे सुद्धा वाचा

‘करण अर्जुन’ शिवाय अभिनेत्रीने ‘छुपा रुस्तम’, ‘चाइना गेट’, ‘कभी तुम कभी हम’, ‘आशिक आवारा’ आणि ‘सबसे बडा खिलाडी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता ‘बिग बॉस १७’ च्या माध्यमातून अभिनेत्री पुन्हा सलमान खान याच्यासोबत दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ममता कुलकर्णी हिचं इब्राहिमच्या शुटरसोबत खास कनेक्शन

ममता कुलकर्णी हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. पण गँगस्टर विक्रम गोस्वामी याच्यासोबत ममता हिच्या नाव जोडलं जावू लागलं आणि सर्वत्र त्यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. एवढंच नाही तर, विक्रम गोस्वामी आणि ममता यांनी लग्न केल्याची देखील चर्चा रंगली. लग्नानंतर दोघे देश सोडून गेले. शिवाय अभिनेत्री ड्रग्स प्रकरणी तुरुंगातही गेली होती. गँगस्टर विक्रम गोस्वामी, इब्राहिम याचा गुंड होता.

‘बिग बॉस १७’ चे स्पर्धक सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १७’ शोची चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस १७’ शोमध्ये ईशा मालवीय, अभिषेक कुमार, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, कंवर ढिल्लन, एलिस कौशिक, करण सेम्बी, अंकिता लोकंडे आणि विक्की जैन यांसारखे सेलिब्रिटी दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.