एकमेकांच्या प्रेमात बुडाले पण कधीच एकत्र येऊ शकले नाही, सलमान-ऐश्वर्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल
सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे एकेकाळी बॉलिवूडचं सर्वात बेस्ट कपल मानलं जायचं. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. पण नंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला. ऐश्वर्याने पुढे लग्न करण्याचा निर्णय घेतला पण सलमान खान आजही अविवाहित आहे. सलमान आणि ऐश्वर्याची केमेस्ट्री या एका व्हिडिओत दिसत आहे.

Salman aishwarya video : सलमान खान आणि ऐश्वर्या राय या जोडीची बॉलिवूडमध्ये आजही चर्चा होते. दोघांचे ब्रेकअप झाले असले तरी देखील त्यांची जोडी सुंदर असल्याचं त्यांचे चाहते बोलत असतात. एकेकाळी हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रेमळ जोडपं होतं. जे एकमेकांचे खूप कौतुक करायचे. सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे मार्ग आता वेगळे आहेत. ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत विवाह केला असला तरी आता दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही वेगळे राहत आहेत. पण अभिषेक सोबत लग्नाआधी ऐश्वर्या सलमानच्या प्रेमात होती. त्यांच्या डोळ्यात एकमेकांवरचे प्रेम दिसत होते.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती, पण त्यानंतर हे दोघे कधीी एकत्र दिसले नाहीत. मात्र त्यांच्या जोडीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. दोघांचा एक अतिशय क्यूट व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमान खान जवळ आले होते. त्यांच्यात नवं नातं तयार झालं होतं. या चित्रपटानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले होते. पण ते कधीही एक होऊ शकले नाहीत. दोघांचा एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खान एकमेकांसोबत परफॉर्म करताना दिसत आहेत.
दोघेही त्यांच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स करत आहेत. सलमान खान आणि ऐश्वर्या यांनी नंतर कधीही परत एकत्र सिनेमा केला नाही. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. ऐश्वर्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला पण सलमानने लग्न केले नाही, त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले पण त्याला कधीची दुजोरा मिळाला नाही.
आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दोघांची एनर्जी जबरदस्त आहे. यूट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडिओ अजूनही खूप व्ह्यूज गोळा करत आहे.
आजही दोघांचे चाहते हा व्हिडिओ लाइक करतात आणि कमेंटही करतात. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट केली आहे की, जर दोघांनी लग्न केले असते तर ते आज बॉलिवूडचे बेस्ट कपल झाले असते. आणखी एका युजरने लिहिले की, खरे प्रेमी कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. याचा अंदाज या जोडीला पाहून लावता येतो. एका यूजरने लिहिले की, या दोघांचे डोळे सर्वकाही सांगण्यासाठी पुरेसे आहेत.