सलमान खान सिनेमाच्या सेटवर सारखा ऐश्वर्याला…. प्रसिद्ध अभिनेत्रीने केली पोलखोल
सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्यातील नातं खूप दिवस टिकलं नाही. पण जेव्हा ते प्रेमात पडले होते तेव्हा ते सगळ्या बॉलिवूडला कळालं होतं. आज देखील त्यांच्या प्रेमाची चर्चा होते. सलमान खान अजूनही ऐश्वर्याला विसरु शकलेला नाही. हम दिल दे चुके सनम सिनेमाच्या सेटवर काय झालं होतं हे एका अभिनेत्रीने सांगितले आहे.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट चांगलाच गाजला होता. कारण या सिनेमानंतर ऐश्वर्या आणि सलमान जवळ आले होते. सलमान आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी आज कोणापासूनही लपलेली नाही. सलमान खान ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. या सिनेमात या सर्व गोष्टींचा खुलासा सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता जयकर यांनी केला आहे. स्मिताने सांगितले की, सलमान खान कसा ऐश्वर्याचा वेडा होता आणि हीच वेळ होती जेव्हा त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. स्मिताने ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका साकारली होती.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात प्रेम फुलत होतं. सेटवर ही गोष्ट सगळ्यांना कळली होती. या सिनेमात ऐश्वर्याच्या आईची भूमिका साकारणारी स्मिता जयकर यांनी यावर खुलासा केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांचे प्रेम कसे फुलत होते.
अभिनेत्रीने फिल्मीबीटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सलमान खान स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता. तो सारखा जाऊन अभिनेत्रीला टच करायचा. ‘आँखों की गुस्ताखियां’ गाण्याचे शूटिंग सुरू असताना देखील हेच झाले. त्याला माझी काळजी घ्यावी लागली कारण मी त्याच्यासाठी आईसारखी आहे. मात्र यादरम्यान सलमान ऐश्वर्याला वारंवार स्पर्श करत होता. यामुळे दिग्दर्शकही सलमानवर संतापला होता. ऐश्वर्याला हात लावू नको असं संजय म्हणाला. तू तिला का स्पर्श केलास?
अलीकडेच स्मिता यांनी आणखी एक मुलाखत चर्चेत आहे, ज्यामध्ये त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचा वारंवार उल्लेख केला आहे. स्मिता सांगतात की, जेव्हा आम्ही गाण्याचे शूटिंग करत होतो तेव्हा ते घराबाहेर शूट करावे लागे. सलमान आणि ऐश्वर्याला तयार व्हायला वेळ लागला, म्हणून आम्ही सेटअप केला. आम्ही इथे अंताक्षरी खेळायचो. या काळात आमचं नातं खूप घट्ट झालं. आम्हाला शूटिंगसाठी पूर्ण 10 दिवस लागले आणि आमच्याकडे मर्यादित वेळ होता.