सलमान खान – ऐश्वर्या राय पुन्हा एकत्र? अंबानींच्या लग्नातील फोटो, काय आहे सत्य?
Salman Khan - Aishwarya Rai: बच्चन कुटुंबासोबत नाही तर, अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय दिसली सलमान खान याच्यासोबत? व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर व्हाल अवाक्, सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या - सलमान यांच्या फोटोची चर्चा...
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना एकत्र पाहाण्यासाठी आजही चाहते प्रतिक्षेत असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये सलमान – ऐश्वर्या एकाच छताखाली असतात. पण कधीच एकमेकांच्या आमने-सामने देखील येत नाहीत. पण आता दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ऐश्वर्या – सलमान एकत्रच दिसत आहेत. फोटो पाहिल्यानंतर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सलमान – ऐश्वर्या यांच्यासोबत भाईजानची लहान बहीण अर्पिता शर्मा देखील दिसत आहे. सोशल मीडियावर तिघांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोबद्दल सांगायचं झालं तर, अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नात सलमान – ऐश्वर्या सामिल झाले होते. पण फोटो फेक असून AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे.
AI is really dangerous😭 pic.twitter.com/0QarGrqyJp
— Prayag (@theprayagtiwari) July 13, 2024
अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, देश – विदेशातील दिग्गज व्यक्ती अंबानींच्या लग्नात सामिल झाले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंब देखील सामिल झालं होतं. बच्चन कुटुंबाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन नंदा, निखील नंदा, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा दिसत आहेत. व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नातं आराध्या बच्चन दिसत नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं.
View this post on Instagram
दरम्यान, अंबानींच्या लग्नातील इनसाईड फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या – अभिषेक एकत्र दिसल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना पूर्वविराम लागला. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ऐश्वर्या – अभिषेक यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांचं लग्न
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर, ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक बच्चन याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला.