मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कामाई करताना दिसत आहे. चाहत्यांना देखील ‘टायगर 3’ सिनेमा प्रचंड आवडत आहे. दरम्यान, सिनेमाला यश मिळाल्यामुळे एका इव्हेंडचं आयोजन करण्यात आलं होतं. इव्हेंटमध्ये सलमान खान, कतरिना कैफ, इम्रान हाश्मी पोहोचले. यावेळी सलमान खान याने सर्वांसमोर कतरिना हिच्यासोबत रोमान्स केला, तर इम्रान हाश्मी याच्या किसिंग सीनवर भाईजान याने मोठं वक्तव्य केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान – कतरिना यांच्या रोमान्सची चर्चा रंगली आहे.
सध्या सोशल मीडियावर काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये सलमान आणि कतरिना ‘लेके प्रभ का नाम’ गाण्यावर दमदार डान्स करताना दिसत आहे. तर एका व्हिडीओमध्ये सलमान कतरिना हिच्या गळ्यात स्कार्फ टाकताना दिसत आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने ‘मंगळसूत्र नाही तर स्कार्फ…’ असं कमेंटमध्ये म्हणाला आहे.
एवढंच नाही तर, कतरिना कैफ हिच्यासोबत सिनेमात केलेल्या रोनान्सबद्दल देखील अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. भाईजान म्हणाला, ‘सिनेमात कतरिना कैफ आहे तर, तिच्यासोबत थोडा रोमान्स केला तरी काही हरकत नाही…’ सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगत आहेत.
‘जर इम्रान हाश्मी आतिशच्या भूमिकेत नसता तर, लिपलॉक, किसिंग सीन नक्की असते. मला तर कधीच किसिंग सीनची सवय नव्हती. पण आता इम्रान हाश्मी याची देखील सवय सुटत आहे…’ असं देखील सलमान खान म्हणाला.
सध्या सर्वत्र सलमान खान – कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील फक्त आणि फक्त ‘टायगर 3’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील ‘टायगर 3’ सिनेमा मोठी कमाई करत आहे. सिनेमाने 300 कोटी रुपयांचा गल्ला पार केल्याची देखील माहिती समोर येत आहे.
‘टायगर’ सिनेमाच्या दोन्ही भागांना चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. आता ‘टायगर 3’ सिनेमावर देखील चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.