Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचे ‘हे’ प्रसिद्ध हिरो पोहोचले मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या रिसेप्शनला

पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या रिसेप्शनला बॉलिवूडच्या 'या' खास सुपरस्टार्सची हजेरी, फोटो व्हायरल

बॉलिवूडचे 'हे' प्रसिद्ध हिरो पोहोचले मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या रिसेप्शनला
बॉलिवूडचे 'हे' प्रसिद्ध हिरो पोहोचले मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या रिसेप्शनला Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 2:00 PM

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्री असो किंवा सर्वसामान्यांचं आयुष्य.. सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम पहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटीसुद्धा लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्यांना इंडस्ट्रीतल्या कलाकारांनीही ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचाही लग्नसोहळा नुकताच पार पडला. मुलगी मैत्रेयी फणसाळकरच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधल्या दोन मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हे दोन मोठे सेलिब्रिटी म्हणजे दबंग सलमान खान आणि रणवीर सिंग हे आहेत.

या रिसेप्शनमधील सलमान आणि रणवीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोमध्ये सलमान खान हा पोलीस आयुक्तांच्या कुटुंबीयांसोबत उभा असल्याचं पहायला मिळतंय. भाईजान सलमानने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. तर त्याच्या एका बाजूला पोलीस आयुक्तांची मुलगी आणि दुसऱ्या बाजूला जावई उभे आहेत.

हे सुद्धा वाचा

सलमान खानसोबतच सोशल मीडियावर आणखी एक फोटो व्हायरल होतोय. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग पहायला मिळतोय. रणवीर ज्या कार्यक्रमाला हजेरी लावतो, तिथे स्वत:च्या खास अंदाजात माहौल निर्माण करतो. हीच गोष्ट या रिसेप्शन पार्टीतही पहायला मिळाली.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणवीर हा स्टेजवर उभा असून त्याच्या हातात माईक पहायला मिळतोय. त्यामुळे रिसेप्शनमध्येही त्याने उपस्थितांचं पुरेपूर मनोरंजन केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त

ज्यादिवशी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मुलीचं लग्न होतं, त्याच दिवशी महाविकास आघाडीचा मोर्चाही होता. आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी आधी महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या बंदोबस्तावर बारिक नजर ठेवली, सर्व नियोजन केलं. मोर्चा पार पडल्यानंतर त्यांनी मुलीच्या लग्नसोहळ्यात भाग घेतला.