राम मंदिर प्राण प्रतिष्ठा नाही, शाहरुख – सलमान यांनी 26 जानेवारीच्या निमित्ताने म्हणाले…
Salman Khan - Shah Rukh Khan : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा नाही तर, 26 जानेवारीच्या निमित्ताने शाहरुख खान आणि सलमान खान यांचं मोठं वक्तव्य..., दोघांची सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर चाहते म्हणाले...
मुंबई | 27 जानेवारी 2024 : संपूर्ण भारताने 26 जानेवारी रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. 26 जानेवारी रोजी भारतीय सोशल मीडियाच्या माध्यमातून देशावर असलेलं प्रेम व्यक्त करत होते. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. करीना कपूर, अर्जुन कपूर, सोनाली बेंद्रे, कतरिना कैफ-विक्की कौशल, आयुष्मान खुराना यांनी देखील मोठ्या थाटात प्रजासत्ताक दिन साजरा केला. एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून देशावर असलेलं प्रेम व्यक्त केलं.
सांगायचं झालं तर, अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण मिळालं नव्हतं. पण प्रजासत्ताक दिनच्या मुहूर्तावर सलमान खान आणि शाहरुख खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या.
सलमान खान आणि शाहरुख खान यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. सलमान खान एक्सवर म्हणाला, ‘सर्वांना प्रजासत्ताक दिनच्या खूप शुभेच्छा…’, तर दुसरीकडे शाहरुख खान याने तिरंगा फडकवत एक फोटो शेअर केला होता.
Wishing A Very Happy Republic Day To All
— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 26, 2024
फोटो पोस्ट करत किंग खान म्हणाला, ‘तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनच्या खूप शुभेच्छा… आपल्या राष्ट्राची एकता… शक्ती आणि अभिमानाचे प्रतीक… तिरंगा सदैव उंच फडकत राहो. भारतीय या नात्याने आपण आपल्या देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी हातभार लावूया. जय हिंद!’ शाहरुख खान याच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
एक नेटकरी किंग खान याच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पठाण सिनेमाला एक वर्ष पूर्ण…’ एवढंच नाही तर, अनेक चाहत्यांनी अभिनेत्या आगामी सिनेमासाठी देखील शुभेच्छा दिल्या. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.