‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सलमानने ऐश्वर्याला नव्हे तर ‘या’ मुलीला घातली होती लग्नाची मागणी
अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरच्या चर्चा आजही चवीने चघळल्या जातात. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र या चित्रपटाच्या सेटवर सलमानने ऐश्वर्याला नव्हे तर दुसऱ्याच मुलीला लग्नासाठी विचारलं होतं.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम करताना अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. या दोघांच्या अफेअरची त्यावेळी जोरदार चर्चा होती. इतकंच नव्हे तर त्यांच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये होते. आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा सलमान आणि भन्साळी एकत्र दिसले. ‘हिरामंडी’ या भन्साळींच्या वेब सीरिजच्या प्रीमिअरदरम्यान दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझ दिले. तेव्हा पुन्हा एकदा ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने एका मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. विशेष म्हणजे ही मुलगी ऐश्वर्या राय नव्हती.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भन्साळी यांची भाची शर्मिन सहगल अनेकदा सेटवर जायची. एके दिवशी सलमानने तिला मस्करीत विचारलं, “तू माझ्याशी लग्न करशील का?” त्यावेळी शर्मिन फक्त तीन-चार वर्षांची होती. सलमानच्या प्रश्नावर ती हसली आणि तिने त्याला “नाही” असं उत्तर दिलं. तीच शर्मिन आता मोठी झाली असून भन्साळींच्या ‘हिरामंडी’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. शर्मिन आता सलमानची खूप मोठी चाहती आहे. ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातील सलमानचं काम पाहिल्यानंतर त्याच्या प्रेमात पडल्याचं शर्मिनने एका मुलाखतीत सांगितलं.
View this post on Instagram
या मुलाखतीत शर्मिनने सलमानच्या प्रपोजलचाही किस्सा सांगितला. “त्यावेळी मी खूपच लहान होते. मला लग्नाच्या संकल्पनेविषयीही फारशी माहिती नव्हती. लहानपणी माझं प्रत्येक गोष्टीसाठी एकच उत्तर असायचं, ते म्हणते ‘नाही’. त्यामुळे सलमान सरांनाही मी त्यावेळी थेट नाही म्हणाले होते.” शर्मिनने भन्साळींसोबत ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. 2019 मध्ये तिने ‘मलाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यु’चा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर 2022 मध्ये तिने ‘अतिथी देवो भव’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. शर्मिन ही भन्साळींची छोटी बहीण आणि फिल्म एडिटर बेला सेहगल यांची मुलगी आहे.