सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलावर येवून थांबल्या सर्वांच्या नजरा, व्हिडीओ पाहून म्हणाल…
Salman Khan Bodyguard Shera Son: 'शेराचा मुलगा इतका मोठा...', सलमान खानचा खास बॉडीगार्ड शेराच्या मुलाच्या सर्वत्र चर्चा..., त्याला पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल..., व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Salman Khan Bodyguard Shera Son: बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता सलमान खान नाही तर, अभिनेत्याचा बॉडीगार्ड गुरमीत सिंग जॉली ऊर्फ शेरा याच्या मुलाच्या चर्चा रंगल्या आहे. शेरा कायम सलमानच्या सुरक्षेसाठी पुढे असतो. आता सलमान आणि शेरा यांच्यासोबत शेराचा मुलगा देखील समोर आला आहे. शेराच्या मुलाचं नाव अबीर सिंग असं आहे. नुकताच झालेल्या एका दिवाळी पार्टीमध्ये सलमान खान आणि शेरा यांच्यासोबत अबीर देखील पोहोचला होता.
सध्या अबीर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळी पार्टी दरम्यान शेरा आणि मुलगा अबीर याने एकत्र पापाराझींना पोज देखील दिल्या. शेरा आणि अबीर याला एकत्र पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
अबीर याला पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘शेरा सारखाच दिसत आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘शेराचा मुलगा शेराचा बाप दिसत आहे.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मुलापेक्षा जास्त स्मार्ट बाप दिसत आहे.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘शेराकडे पाहून वाटत नाही त्याचा मुलगा इतका मोठा असेल…’ सध्या सोशल मीडियावर फक्त फक्त शेरा आणि मुलगा अबीर याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
अबीर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अबीर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर अबीरच्या चाहत्यांची संख्या देखीर फार मोठी आहे. सोशल मीडियावर अबीर याला 12,800 नेटकरी फॉलो करतात. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान लवकरच अबीर याला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. पण याबद्दल अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही.
अबीर याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याने सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टारर ‘सुल्तान’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. आता अबीर बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करेल याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
शेरा याची संपत्ती
गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमान खानसाठी काम करत आहे. प्रत्येक ठिकाणी शेरा, सलमान याच्यासोबत सावली सारखा असतो. शेरा याच्या महिन्याचं मानधन 2 कोटी रुपये आहे. शिवाय शेराची स्वतःची एक कंपनी आहे. जी इतर सेलिब्रिटींना सुरक्षा प्रदान करते. एवढंच नाही तर, शेराकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. शेरा हा तब्बल 100 कोटी रुपयांचा मालक आहे.