Salman Khan ने घेतली कोट्यवधींची बुलेटप्रूफ कार, ‘ती’ भारतात लॉन्च झाली नाही, मग भाईजानला कशी मिळाली?

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने नुकतीच स्वत:साठी कोट्यवधींची बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान नवीन चमकदार निसान पेट्रोल एसयूव्हीमध्ये दिसला

Salman Khan ने घेतली कोट्यवधींची बुलेटप्रूफ कार, 'ती' भारतात लॉन्च झाली नाही, मग भाईजानला कशी मिळाली?
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 4:18 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ज्यामुळे अभिनेत्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली. अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची बातमी ताजी असताना, सलमान याने नवीन बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही ही महागडी गाडी खरेदी केली आहे. पण तुम्हाला महिती नसेल की, भाईजानने खरेदी केलेली महागडी आणि बुलेटप्रूफ कार अद्याप भारतात लॉन्च झालेली नाही. असं असताना सलमान याने कार खरेदी केली कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सर्वत्र सलमान खान आणि त्याच्या नव्या कारची चर्चा रंगत आहे.

नुकताच सलमानला त्याच्या बुलेटप्रूफ निसान पेट्रोल कारमध्ये स्पॉट करण्यात आलं. भारताच्या रस्त्यांवर जेव्हा भाईजानची नवी चमकती कार धावत होती, तेव्हा अनेकांच्या नजरा भाईजानच्या कारकडे येवून थांबल्या. एवढंच नाही तर, मुंबईच्या रस्त्यांवर देखील भाईजानला नवीन कारमध्ये पाहण्यात आलं.

यावेळी सलमान खान याच्यासोबत काळ्या रंगाची Toyota Fortuner होती. त्याच्या पुढे सलमान खानी पर्सनल सिक्योरिटी होती आणि मागे एका Mahindra Bolero Neo मध्ये पोलीस अधिकारी होते. निसान पेट्रोल ही निसानने बनवलेली आतापर्यंतची सर्वात महागडी SUV आहे.

हे सुद्धा वाचा

निसानची ही महागडी SUV कार भारतात आग्नेय आशियाच्या मार्केटमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ही कार भारतात विकली जात नाही. त्यामुळे सलमान खानने ही कार आंतरराष्ट्रीय बाजारातून खाजगीरित्या आयात केली आहे. SUV सर्वात सुरक्षित कार आहे. सलमान खान त्याच्या नवीन बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्हीमध्ये प्रवास करतानाचा व्हिडिओ अनेक यूट्यूब चॅनलद्वारे शेअर करण्यात आला आहे.

सलमान खान याने जी Nissan Patrol कार खरेदी केली आहे, ती सर्वात महागडी कार आहे. या कारची किंमत जवळपास ८० लाख रुपये आहे. पण कार बुलेटप्रूफ असल्यामुळे SUVची किंमत कोट्यवधी रुपये असणार आहे.,

सलमान खानने त्याच्या गॅरेजमध्ये पहिल्यांदाचं बुलेटप्रूफ कार आली नसून, याआधी देखील सलमानने बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. सलमानने नुकताच त्याची टोयोटा लँड क्रूझर एसयूव्ही आर्मर आणि बुलेटप्रूफ ग्लाससह अपग्रेड केली आहे.

सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

एवढंच नाही तर, किसी का भाई किसी की जान सिनेमातून अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.