Salman Khan चं पहिलं प्रेम ऐश्वर्या राय कधीच नव्हती, ‘त्या’ तरुणीसोबत अभिनेत्याचं लग्न झालं असतं तर…

| Updated on: Dec 27, 2022 | 11:59 AM

सलमानच्या मनात एक मुलगी होती, तिच्याबद्दल अभिनेत्याने 'बिग बॉस 13' शो दरम्यान सांगितलं होतं.

Salman Khan चं पहिलं प्रेम ऐश्वर्या राय कधीच नव्हती, त्या तरुणीसोबत अभिनेत्याचं लग्न झालं असतं तर...
Salman Khan चं पहिलं प्रेम ऐश्वर्या राय कधीच नव्हती, 'त्या' तरुणीसोबत अभिनेत्याचं लग्न झालं असतं तर...
Follow us on

Salman Khan Firth Love : सिनेमा, वादग्रस्त प्रकरणं इत्यादी गोष्टींमुळे अभिनेता सलमान खान कायम चर्चेत असतो. अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक भूमिकांना न्याय देवून सलमानने चाहत्यांच्या मनात स्वतःसाठी वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सलमानच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही, तर साता समुद्रा पार देखील आहे. अशात प्रत्येक चाहत्यांचा सलमानला एकच प्रश्न असतो, तो म्हणजे ‘सलमान खान लग्न कधी करणार?’ सलमाने अद्याप लग्न केलेलं नाही पण अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडण्यात आलं.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमानच्या नात्याच्या अनेक चर्चा रंगल्या. महत्त्वाचं म्हणजे, सलमानचं पहिलं प्रेम ऐश्वर्या राय कधीच नव्हती. सलमानच्या मनात एक मुलगी होती, तिच्याबद्दल अभिनेत्याने ‘बिग बॉस 13’ शो दरम्यान सांगितलं होतं.

जेव्हा सलमानने त्या तरुणीबद्दल सांगितलं तेव्हा अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल त्यांचा ‘तान्हाजी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस 13’ मध्ये आले होते. तेव्हा सलमानने त्याच्या लहानपणीच्या प्रेमाबद्दल सांगितलं. जी मुलगी सलमानला आवडली होती तिचे नातवंड आज सलमानचे चाहते आहेत.

हे सुद्धा वाचा

त्या मुलीबद्दल सांगताना सलमान म्हणाला, ‘मी खरंच तिच्यावर प्रचंड प्रेम करत होतो. पण ती नकार देईल या भीतीने मी माझ्या भावना कधी व्यक्त केल्या नाहीत. माझे तीन मित्र तिला डेट करत होते, पण मला नंतर कळालं तिला मी आव डतो.’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘बरं झालं मी तेव्हा तिच्या समोर माझ्या भावना व्यक्त केल्या नाहीत, कारण ती 15 वर्षांपूर्वी आजी झाली आणि तिचे नातवंड आता माझे चाहते आहेत.’ सलमानच्या या वक्तव्यानतंर अजय-काजोल सोबतच प्रेक्षक देखील पोट धरून हसले.

दरम्यान, सलमानचा आज वाढदिवस आहे. सलमान कुटुंब आणि मित्र परिवारासोबत मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करत आहे. आज सलमान खान 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानचा वाढदिवस असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य चाहते अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत.