Salman Khan जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सतर्क; म्हणाला, ‘माझ्या चारहीबाजूला बंदुका आणि…’

' जे काही व्हायचे आहे ते होणारच....' असं म्हणणाऱ्या सलमान खान याचं जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मोठं वक्तव्य, अभिनेता ट्रॅफिकमध्ये असल्यावर घाबरतो कारण...

Salman Khan जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सतर्क; म्हणाला, 'माझ्या चारहीबाजूला बंदुका आणि...'
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 10:28 AM

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर भाईजानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेसाठी त्याचे बॉडीगार्ड आणि मुंबई पोलीस देखील सतर्क आहेत. अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून अभिनेत्याला व्हाय प्लस सुरक्षा प्रदाण करण्यात आली आहे. याशिवाय खुद्द भाईजानने स्वतःसाठी बुलेटप्रुफ गाडी खरेदी केली आहे. सुरक्षेची काळजी घेत गाडी तयार करण्यात आली आहे. कार भारतात लॉन्च झाली नसल्यामुळे सलमानने परदेशातून गाडी मागवली आहे. गाडीसाठी अभिनेत्याने मोठी रक्कम मोजली आहे. सध्या सर्वत्र सलमानच्या सुरक्षेची चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. अभिनेता सध्या अनेक गँगस्टरांच्या निशाण्यावर आहेत. नुकताच सलमान खान याने फिल्मफेअर पुरस्कार सोहळा होस्ट केला. यावेळी देखील सलमान खान याच्या चारही बाजूंनी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. आता सलमान ज्याठिकाणी जातो, त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो.

एका मुलाखतीत खुद्द सलमान खान याने सांगितलं की, तो या प्रसंगाचा कशाप्रकारे सामना करत आहे. ‘असुरक्षिततेपेक्षा सुरक्षितता चांगली आहे…. सुरक्षा आहे… आता रस्त्यावर सायकल चालवणं आणि एकट्याने कुठेही जाणं शक्य नाही. जेव्हा ट्रॅफिकमध्ये असतो तेव्हा मला अधिक त्रास होतो. माझ्या सुरक्षेमुळे इतर लोकांची गैरसोय होते. ते सर्व मलाही लुक देतात. माझे चाहते… पण मोठा धोका आहे म्हणून सुरक्षा आहे…’

सलमान खानच्या म्हणण्यानुसार, त्याला जे सांगितले जात आहे, अभिनेता त्याचं पालन करत आहे. खुद्द सलमानला हे चांगलेच ठाऊक आहे की, त्याला खूप काळजी घेण्याची गरज आहे. म्हणूनच तो सर्वत्र पूर्ण सुरक्षेसह घरा बाहेर पडतो. जे काही व्हायचे आहे ते होणारच. असं देखील सलमान खान म्हणतो…

पुढे अभिनेता म्हणतो, ‘चारही बाजूला इतके शेरा आणि इतक्या बंदुका पाहून मी घाबरतो.’ महत्त्वाचं म्हणजे सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबाला देखील सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. शिवाय सलमान खाल याला देखील अनेक सुचना देण्यात आल्या आहेत.

सलमान खान सध्या ‘किसी का भाई किसी जान’ सिनेमामुळे देखील चर्चेत आहे. २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकला नाही.

रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....