मुंबई : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘आयफा’ पुरस्करा सोहळ्याची चर्चा रंगत आहे. सोळल मीडियावर देखील आयफा पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. पुरस्कार सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना एका व्हिडीओने मात्र अनेकांचं लक्ष वेधलं. ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात अभिनेता सलमान खान याच्या बॉडीगार्डने अभिनेता विकी कौशल याला धक्का मारला, तर भाईजानने विकीकडे दुर्लक्ष केलं. गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणावर सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर व्हिडीओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी सलमान खान याला पाठिंबा दिला तर, काही चाहते विकी कौशलच्या पाठिशी खंबीर उभे राहिले. यावर विकी कौशल याने प्रतिक्रिया दिल्यानंतर अभिनेता सलमान खान याने देखील मौन सोडलं आहे.
याप्रकरणी सलमान खान याच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जेव्हा रेड कार्पेटवर सलमान खान आला तेव्हा अनेक सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्ड्ससोबत तेथे उपस्थित होते. अशात सलमान खान याला तेथून काढता पाय घ्यावा लागला. सलमानच्या टीमने अभिनेत्याला पुढे नेलं. एवढंच नाही तर, विकीसोबत सलमानला बोलायचं होतं…’
‘व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमान खान याला देखील वाईट वाटलं.. अशात सर्वकाही लवकरात लवकरत ठिक करायला हवं.. असं देखील सलमान खान म्हणाला…’ शिवाय त्यानंतर व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये सलमान खान विकी कौशलला मिठी मारताना दिसला. महत्त्वाचं म्हणजे, लॉरेन्स बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे..
‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेबद्दल खुद्द विकी कौशल याने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. अभिनेता म्हणाला, ‘कही गोष्टींबद्दल अनेकदा अर्थ नसलेल्या चर्चा सुरु असतात. वास्तवमध्ये गोष्टी दिसतात तशा नसतात. व्हिडीओमध्ये जे दिसत आहे, तसं काहीही नाही.. यावर बोलण्याचा काहीही अर्थ नाही…’ असं विकी म्हणाला..
विकी कौशल कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता लवकरच, अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सर्वत्र सारा आणि विकी यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे.
सारा अली खान आणि विकी कौशल स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमा २ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सारा आणि विकी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या माध्यमातून सारा आणि विकी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.