सलमान खानच्या दिवसाची कमाई कोट्यवधी,पण खिशात नसतो एक रुपया, काय आहे कारण?

| Updated on: Mar 09, 2024 | 9:25 AM

दिवसाला कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सलमान खानच्या खिशात का नसतात पैसे... कुठे खर्च करतो भाईजान? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा... अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम असतात उत्सुक...

सलमान खानच्या दिवसाची कमाई कोट्यवधी,पण खिशात नसतो एक रुपया, काय आहे कारण?
Follow us on

मुंबई | 9 मार्च 2024 : अभिनेता सलमान खान याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. लहान मुलांमध्ये देखील भाईजानच्या नावाचा बोलबाला असतो. सलमान खान फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाहीतर, इतर अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. सांगायचं झालं तर, दिवसाला कोट्यवधी रुपये कमावणार सलमान खान अनेकांच्या मदतीला सर्वात पुढे असतो. वेळ आली तर सलमान सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांसाठी देखील धावत येतो. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सलमान खान याचं कौतुक केलं आहे.

अभिनेता विंदू दारा सिंग याने देखील सलमान खानचं कौतुक केलं आहे. शिवाय सलमान खान याच्या संपत्तीबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. विंदू याने सलमान खान बद्दल अशी गोष्ट सांगितली आहे, जी फार कोणाला माहिती नसेल… विंदू आणि सलमान अनेक वर्षांपासून मित्र आहेत.

सलमान खान याच्याबद्दल विंदू म्हणाला, ‘सलीम काका सलमानचा मित्र नदीम याला रोज 50 हजार किंवा लाख रुपये द्यायचे आणि म्हणायचे काही खर्चाला लागले तर यातून कर… सलमानचा खासगी खर्च कधीच नसायचा. सलमानचे वडील त्याला जेवढे पैसे द्यायचे तेवढे पैसे तो गरिबांना द्यायचा…’

‘सलमानचं काम आजही तसंच सुरु आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमची शुटिंग सुरु असायची तेव्हा अनेक जण सलमानला भेटण्यासाठी यायचे. कोणी पेपर दाखवायचे, तर कोणी काही कारण द्यायचे. तेव्हा नदीम आणि शेरा लोकांना कडून माहिती घ्यायचे आणि त्यांना सलमान याच्याकडे पाठवायचे.’

‘सलमान खान अनेकांच्या मदतीसाठी धावून जाते. अशा प्रकारे 25-30 लाख रुपये खर्च होतात. आजपर्यंत तो लोकांची मदत करतो. सलमानकडे फक्त एक कार्ड असतो…’ सलमान खान याने अनेक कॅन्सर ग्रस्तांना देखील मदत केली आहे. सलमान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील सलमानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सलमानची एक झलक पाहण्याची चाहते उत्सुक असतात. सलमान देखील कधी चाहत्यांना नाजार करत नाही. विशेषतः लहान चाहत्यांना.

सोशल मीडियावर देखील सलमान खान कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता स्वतःचे फोटो आणि आगामी सिनेमांबद्दल माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करतो.