बालपणी लैंगिक शोषण, सलमान खानवर गंभीर आरोप, आता असं आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री

सलमान खनेने केली मारहाण आणि मेकअप आर्टिस्टने लपवलेल्या जखमा..., अभिनेत्री भाईजानवर अनेकदा केलेत गंभीर आरोप... फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखणं कठीण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री, तिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

बालपणी लैंगिक शोषण, सलमान खानवर गंभीर आरोप, आता असं आयुष्य जगतेय 'ही' अभिनेत्री
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 12:30 PM

मुंबई | 13 मार्च 2024 : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात अभिनेता सलमान खान याच्या गर्लफ्रेंड्सची लिस्ट फार मोठी आहे. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींना सलमान खान याने डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अनेक अभिनेत्रींसोबत भाईजानच्या ब्रेकअपच्या चर्चा समोर आल्या. एवढंच नाहीतर, अनेक अभिनेत्रींनी सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले. सलमानच्या गर्लफ्रेंडमधील अशीच एक अभिनेत्री म्हणजे पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली…

सोमी अली हिने सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. एक मुलाखतीत सोमी अली हिने खुलासा केला होता की, सोमी फक्त आणि फक्त सलमानसाठी भारतात आली होती. दोघांनी एकमेकांना तब्बल आठ वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत प्रचंड वाईट झाला होता.

सोमी अलीने सलमानवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे आरोप लावले होते. एवढंच नाहीतक, मेकअप आर्टिस्ट अजय शेलार याने अभिनेत्रीच्या शारीरावर असलेल्या जखमा मेकअपने लपवल्याचा खुलासा देखील अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता.

हे सुद्धा वाचा

सोमीने सलमानवर आरोप करायची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने सोशल मीडियाद्वारे सलमानवर खळबळजनक आरोप केले होते. मात्र नंतर तिने हे पोस्ट डिलिट केले. अनेकदा सोमी सलमानविषयी व्यक्त झाली आहे. सोमी अली आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

बालपणी लैंगिक शोषण

सोमी अली हिने लहानपणापासून अनेक धक्कादायक प्रसंगांचा सामना केला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री बालपणी झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितलं होतं. अभिनेत्री वडील दिग्दर्शत आणि निर्माते होते. पण सोमीच्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणं व्हायची… याचाच फायदा घरातील कूकने घेतला होता. तेव्हा अभिनेत्री फक्त पाच वर्षांची होती.

वयाच्या 9 व्या वर्षी देखील सोमी अली हिने लैंगिक शोषणाचा सामना केला. गेटवर उभ्या असलेल्या वॉचमनने अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं होतं… सोमी अली कायम तिच्या आयुष्यातील चांगल्या – वाईट गोष्टी सोशल मीडिया आणि मुलाखतींच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.

सोमी अली हिचे सिनेमे

सोमी अली हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. आओ प्यार करें, आंदोलन, अंत और तीसरा कौन यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्र यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली नाही…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.