सलमान खान याच्याबद्दल एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, म्हणाली, त्याने मला…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या चर्चेत दिसतोय. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. सलमान खान सध्या बिग बॉस 18 चे शूटिंग देखील करतोय. सलमानचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलेले आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या तूफान चर्चेत असलेले एक नाव आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. त्यामध्येच आता एनसीपी नेता आणि सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्यावर भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एक पोस्ट लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. मुंबई पोलिस आणि खासगी सुरक्षारक्षक सलमान खानची सुरक्षा करत आहेत. आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंज सोमी अली चांगलीच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. सोमी अली हिने लॉरेन्स बिश्नोईला मोठी विनंती केली.
सोमी अली आणि सलमान खान हे साधारण आठ वर्ष रिलेशनमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच सोमी अली हिने सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले. हेच नाही तर त्याने रिलेशनमध्ये आपल्याला धोका दिल्याचे तिने म्हटले. काही मुलाखतीमध्येही सोमी अली ही सलमान खान आणि तिच्या नात्यावर थेट बोलताना दिसली.
सोमी अली हिने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, एका महिलेला मारहाण करणारा फक्त मीच नाही तर माझ्यासारख्या कितीतरी आहेत. कृपया त्याची पूजा करणे थांबवा. तो एक सेडिस्टिक सिक आहे, ज्याचा तुम्हाला अंदाजा नाही. सलमान खानसाठी तिने ही पोस्ट शेअर केली होती. शिवाय तिने काही मुलाखतींमध्येही मोठे खुलासे केले होते.
सोमी अलीने एका मुलाखतीमध्ये थेट म्हटले होते की, त्याने (सलमान खान) मला कितीतरी वेळा मारहाण केली. हेच नाही तर त्याने मला सिगारेट देखील पोळवली. त्याने मला प्रेमात धोका दिला. ज्यावेळी मला काही गोष्टी समजल्या त्यावेळी मी सर्वकाही सोडून गेले. सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर सोमी अली ही फ्लोरिडा गेली होती.