‘खरंच यांना मानलं पाहिजे..’; मलायकाच्या नव्या रेस्टॉरंटला भेट देणाऱ्या खान कुटुंबीयांचं कौतुक

| Updated on: Dec 20, 2024 | 10:24 AM

अभिनेत्री मलायका अरोराने मुलगा अरहान खानसोबत मिळून मुंबईत नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. यानिमित्ताने संपूर्ण खान कुटुंबीय तिच्या या नव्या रेस्टॉरंटला भेट देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी मलायकाचा पूर्व पती अरबाज खानसुद्धा होता.

खरंच यांना मानलं पाहिजे..; मलायकाच्या नव्या रेस्टॉरंटला भेट देणाऱ्या खान कुटुंबीयांचं कौतुक
मलायका अरोरा, अरबाज खान, सलीम खान
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान हे 2017 मध्ये विभक्त झाले. मात्र घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्रीपूर्ण नातं कायम आहे. दोघं मिळून मुलगा अरहान खानचं संगोपन करत होते. आता त्यांचा मुलगासुद्धा मोठा झाला असून त्याने आईसोबत मिळून नवीन व्यवसाय सुरू केला आहे. मुंबईत अरहान आणि मलायका यांनी एक नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. मलायका खान कुटुंबापासून वेगळी झाली तरी तिच्या सुखादु:खात ते कायम सोबत असल्याचं पहायला मिळतं. म्हणूनच मलायकाने नवीन रेस्टॉरंट सुरू करताच खान कुटुंबीय तिच्या या रेस्टॉरंटमध्ये आले. सलीम खान, त्यांच्या दोन्ही पत्नी सलमा खान आणि हेलन, अरबाज खान, अरहान खान आणि सोहैल खानचा मुलगा निर्वाण, सलमानची बहीण अलविरा हे सर्वजण या नव्या रेस्टॉरंटमध्ये आले होते.

खान कुटुंबीयांच्या या भेटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वयोमानामुळे सलीम आणि सलमा खान यांना पायऱ्या उतरायला अडचण होते. परंतु त्यांची नातवंडं यावेळी मदत करतात. अरबाजसुद्धा त्याच्या पूर्व पत्नीच्या रेस्टॉरंटला भेट द्यायला पोहोचतो. यावेळी हेलन अरहानसोबत पापाराझींसमोर फोटोसाठी एकत्र पोझ देतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हे सुद्धा वाचा

‘चालायला त्रास होत असतानाही ते पूर्व सुनेच्या आनंदात सहभागी व्हायला आले’, असं एकाने लिहिलंय. तर ‘खान कुटुंब हे इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कुटुंब आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मलायकाने अरबाजला घटस्फोट देऊन खूप मोठी चूक केली’, असंही काहींनी म्हटलंय. याआधी जेव्हा मलायकाच्या वडिलांच्या निधन झालं, तेव्हासुद्धा संपूर्ण खान कुटुंबीय तिच्या भेटीला पोहोचले होते.

मलायका वडील अनिल मेहता हे मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या इमारतीखाली मृतावस्थेत सापडले होते. त्यांनी सहाव्या मजल्यावरील राहत्या घरातून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मलायकाच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि पूर्व पती-अभिनेता अरबाज खानने वांद्रे इथल्या घरी भेट दिली. त्यानंतर सलीम खान, सलमा खान, अलविरा हे सर्वजणसुद्धा तिला भेटले. घटना घडली तेव्हा सलमान शहराबाहेर होता. नंतर त्यानेसुद्धा मलायकाची भेट घेतली.

मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर खान कुटुंबाने तिची ज्याप्रकारे साथ दिली, त्याविषयी बोलताना सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह एका मुलाखतीत म्हणाली होती, “ते एखाद्या खडकासारखे खंबीर आहेत. जेव्हा एखादं संकट येतं किंवा तुम्हाला कोणतीही गरज असेल तेव्हा ते सर्वजण तुमच्या पाठिशी उभे राहतील. त्यांचा हाच गुण त्यांना एक कुटुंब म्हणून खास बनवतं.”