“तुझा धर्म आम्हाला मंजूर नाही”; सासऱ्यांच्या या वक्तव्यावर सलमान खानच्या वडिलांचं सडेतोड उत्तर

लग्नाआधी सलीम खान हे अजीत साहब यांच्या घरी काही दिवस राहिले होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोरच सलमा खान यांचं घर होतं. सलमा यांचा भाऊ सलीम यांच्यावर खूप प्रभावित झाला होता.

तुझा धर्म आम्हाला मंजूर नाही; सासऱ्यांच्या या वक्तव्यावर सलमान खानच्या वडिलांचं सडेतोड उत्तर
सलमान खानच्या वडिलांनी सांगितला लग्नाचा 'तो' खास किस्साImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 4:08 PM

मुंबई: अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खानच्या ‘द इनविन्सिबल्स’ या नव्या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये त्याचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी हजेरी लावली. या शोमध्ये सलीम खान यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले. पहिली पत्नी सलमा खान यांच्याशी लग्नाबद्दलचा एक किस्सासुद्धा त्यांनी या मुलाखतीत सांगितला. लग्नाआधी सलीम खान हे अजीत साहब यांच्या घरी काही दिवस राहिले होते. त्यावेळी त्यांच्या घरासमोरच सलमा खान यांचं घर होतं. सलमा यांचा भाऊ सलीम यांच्यावर खूप प्रभावित झाला होता.

सलीम खान यांनी सांगितलं, “त्यावेळी पंजा लढवण्यासाठी मी खूप चर्चेत असायचो. लोक संध्याकाळी पंजा लढवण्यासाठी माझ्याकडे यायचे. ते सर्वजण माझ्याने पराभूत होऊन जायचे. याच गोष्टीमुळे मोहल्ल्यात माझी चर्चा असायची. त्याचवेळी तुझ्या आईशी (सलमा खान) माझी मैत्री झाली. माहिमच्या गल्ल्यांमध्ये आम्ही लपून-छपून एकमेकांना भेटायचो. पण असं फार दिवस चालू शकणार नव्हतं. म्हणून मी सलमाला तिच्या वडिलांशी भेटायची इच्छा व्यक्त केली.”

हे सुद्धा वाचा

सलमा यांच्या कुटुंबीयांसोबत झालेल्या त्या पहिल्या भेटीबद्दल ते पुढे म्हणाले, “मी आजपर्यंत कधीच इतका नर्व्हस झालो नव्हतो, तितका त्यादिवशी झालो होतो. तिच्या कुटुंबातील बरेच सदस्य माझ्या बाजूने होते, मात्र सासरे म्हणाले की, बेटा तुझ्याविषयी आम्ही खूप ऐकलंय. तू चांगल्या कुटुंबातून आहे, शिक्षण चांगलं झालं आहे. आमचा काही विरोध नाही. आजकाल चांगली मुलं भेटत नाहीत, पण मला हा धर्म मंजूर नाही.”

सासऱ्यांच्या या वक्तव्यावर सलीम खान यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “डॉक्टर साहब, तुमच्या मुलीशी माझ्या 1760 समस्या होऊ शकतात, पण धर्म हा त्यामागचा कधीही कारण ठरणार नाही.”

लग्नाआधी सलमा खान यांचं नाव सुशीला होतं. त्या हिंदू कुटुंबातील होत्या. मात्र नंतर त्यांनी नाव बदललं. या शोमध्ये सलीम खान यांनी हेसुद्धा सांगितलं की त्यांचंही नाव सलीमवरून शंकर झालं होतं. सलमा खान यांची आजी त्यांना खूप पाठिंबा द्यायच्या आणि त्याच त्यांना शंकर म्हणून हाक मारायच्या. 1964 मध्ये सलीम खान आणि सलमा यांचं लग्न झालं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.