सतत सिगारेट पित राहा…, सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी माहिती समोर
Salman Khan Firing Case: हेलमेट घालू नका... सतत सिगारेट पित राहा..., कुख्यात गुंडांची ऑडिओ क्लिप समोर, सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर, सलमान खान गोळीबार प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे....
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्याआधी अनमोल बिश्नोई शुटर्सना मार्गदर्शन करत असतानाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये अनमोल शुटर्सना म्हणतो, ‘हेलमेट घालू नका आणि सिगारेट ओढत राहा…’, 14 एप्रिल रोजी गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिवाय कुटुंबियांना देखील सतर्क राहाण्यास सांगितलं आहे.
ऑडीओमध्ये अनमोल बिश्नोई शुटर्सना म्हणाला, ‘गोळीबार करताना हेलमेट घालू नका. सतत सिगारेट ओढत राहा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर भीती दिसणार नाही…. तुम्ही इतिहास रचाल…’, सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता. 14 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली होती.
पुढे अनमोल शुटर्सना म्हणाला, ‘गोळीबार विचार करुन करा. प्रत्येक ठिकाणी गोळीबार झाला पाहिजे. गोळीबार करण्यासाठी एक किंवा दीट मिनिटं लागाला तरी चालेल. काही हरकत नाही. पण गोळीबार असा झाला पाहिजे ज्यामुळे सलमान खानच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे…’, त्यांच्यामध्ये अशाप्रकारे झालेल्या संवाद ऑडीओ क्लिपच्या माध्यमातून समोर आला आहे.
सांगायचं झालं तर, यावर सलमान खान याने देखील वक्तव्य केलं आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि बिश्नोई गँगच्या निशाण्यावर माझं कुटुंब देखील आहे. त्यांनी फक्त मला नाहीतर, माझ्या कुटुंबियांनी देखील जीवेमारण्याची धमकी दिली आहे… त्यामुळेच त्यांनी माझ्या घरावर गोळीबार केला… असं सलमान खान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हणाला.
सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार…
सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर दोन अज्ञात इसमांनी 14 एप्रिल रोजी गोळीबार केला. गोळीबाराची जबाबदारी देखील कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकारली. शुटर्स पाल आणि गुप्ता यांनी अभिनेत्याच्या घरावर गोळीबार केला. दोघांना देखील पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.