सलमान खानच्या घरावर का करण्यात आला गोळीबार? पोलिसांकडून मोठी माहिती समोर
Salman Khan Firing Case: सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचं मोठं कारण समोर, आणखी एक सेलिब्रिटी बिष्णोई गँगच्या निशाण्यावर... पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर...
अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणात नवनवे अपडेट्स रोज समोर येत आहेत. आता मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात खळबळजन खुलासा करण्यात आला आहे. राज्यात बिष्णोई गँगला खंडणीचं रॅकेट वाढवायचं होतं म्हणून सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर, बिष्णोई गँगकडून आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बिष्णोई गँगविरोधात 1 हजार 736 पानांचं चार्जशीट देखील दाखल करण्यात आलं आहे.
दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये 6 अटक आरोपी आणि 3 फरार अरोपी आहेत. ज्यामध्ये अनमोल बिष्णोई, लॉरेन्स बिष्णोई आणि रोहित यांची देखील नावे आहेत. त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करत बिष्णोई गँगला मुंबई आणि बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं होतं आणि खंडणीचं रॅकेट महाराष्ट्रात चालवायचं होतं… याचा खुलासा चार्टशीटमध्ये करण्यात आला आहे…
सलमान खान याने देखील चौकशीत मोठा खुलासा केला होता, माझ्याकडून खंडणी उकळण्याचा बिष्णोई गँगचा प्रयत्न आहे. त्यामुळे येत्या काळात याप्रकरणी काय होतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची चर्चा सुरु आहे.
सलमान खान याची चौकशी
गोळीबार प्रकरणी सलमान खान याने देखील पोलिसांना माहिती दिली आहे. गोळीबाराच्या घटनेच्या आदल्या रात्री एका पार्टीनंतर उशिरा घरी पोहोचला होता. पहाटेच्या सुमारास बुलेटच्या आवाजाने त्याला जाग आली. ‘गोळीच्या आवाजाने धक्क्यातून मी जागा झालो आणि बाल्कनीमध्ये तपासण्यासाठी गेलो. बाहेर पाहिलं तर मला कोणीही दिसलं नाही’, असं सलमानने पोलिसांना सांगितलं. यावेळी अभिनेत्याला 150 पेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले होते.
सलमान खान याला सतत मिळणाऱ्या धमक्या
सांगायचं झालं तर, याआधी देखील अनेकदा सलमान खान याला अनेकदा जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरजवळ काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे.