झिगाना गन, 25 लाखांचा करार; सलमान खानला मारण्याचा प्लॅन बिश्णोई गँगने कसा आखला?

या चार्जशीटमध्ये असंही म्हटलंय की सलमानच्या हत्येसाठी जी मुलं निवडण्यात आली होती, ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची होती. ही अल्पवयीन मुलं गोल्डी ब्रार आणि अनमोल बिष्णोई यांच्याकडून ऑर्डर मिळण्याची प्रतीक्षा करत होते.

झिगाना गन, 25 लाखांचा करार; सलमान खानला मारण्याचा प्लॅन बिश्णोई गँगने कसा आखला?
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 11:55 AM

अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगने दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाप्रमाणेच सलमानची गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्लॅन केला होता. याबद्दल महाराष्ट्राच्या पनवेल पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सलमानच्या हत्येच्या प्लॅनिंगमध्ये पाकिस्तानचंही कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांनी त्यांच्या गोपनीय तपासात संशयितांच्या मोबाइल फोन टॉवरच्या लोकेशनची माहिती मिळवून हे विश्लेषण सादर केलंय. पनवेल पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये म्हटलंय की लॉरेन्स बिष्णोई गँग ही एके-47 सह पाकिस्तानमधून इतर शस्त्रे मागवून सलमानची हत्या करण्याची योजना आखत होती. सलमानवर हा कथित हल्ला चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो पनवेल फार्महाऊसमधून बाहेर पडताना केला जाणार होता, असंही त्यात म्हटलंय.

बिष्णोई गँगमधील लोकांचा उल्लेख

पोलिसांनी याप्रकरणी 350 पानांचा आरोपपत्र दाखल केला आहे. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई गँगच्या पाच लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात अजय कश्यप, गौतम भाटिया, वास्पी महमूद खान, रिझवान हसन, दीपक हवा सिंह यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात पनवेल पोलीस इन्स्पेक्टर नितीन ठाकरे यांना सलमानवरील हल्ल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. लॉरेन्स बिष्णोईनेच सलमानवर हल्ला करण्यासाठी गँगला 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं नंतर तपासात उघड झालं होतं.

हे सुद्धा वाचा

सलमानच्या घराजवळ केली रेकी

बिष्णोई गँगचे हे 15-16 जण व्हॉट्स ॲप ग्रुपचा वापर करायचे, ज्यामध्ये लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिष्णोईसुद्धा सहभागी होता. पोलिसांनी पाकिस्तानच्या सुखा शूटर आणि डोगरचीही ओळख पटवली होती. हेच AK-47, M16 किंवा M5 या शस्त्रांचा पुरवठा करणार होते. सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसच्या आजूबाजूचा परिसर नीट समजावा, यासाठी एकाने तिथेच भाड्याने घरसुद्धा घेतलं होतं. पनवेलमधील फार्महाऊस, गोरेगाव फिल्म सिटी आणि वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सजवळ आरोपींनी रेकी केली होती. जेव्हा सलमान शूटिंगसाठी घराबाहेर पडणार होता, तेव्हाच त्याच्यावर सिद्धू मूसेवालाप्रमाणे गोळ्या झाडण्यात येणार होत्या. हत्येच्या या प्लॅनचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.