Salman Khan : सलमानने ज्याला Big Boss च्या घरातून बाहेर काढलं, तो आता लॉरेन्स बिश्नोईच्या बाजूने
Salman Khan : अनेकदा आपण ज्याचा अपमान करतो, तो संधी मिळताच परतफेड करतो. सलमान खानच्या बाबतीत सुद्धा असच होतय. बॉलिवूडमधला त्याचा एका विरोधक लॉरेन्स बिश्नोईच्या बाजूने बोलू लागलाय. सलमानने त्याला Big Boss च्या घरातून बाहेर काढलं होतं. तो राग त्याच्या मनात आहे.
Salman Khan आणि त्याच्या कुटुंबासाठी सध्या संकटाचा काळ आहे. सलमान खानच्या जीवाला धोका आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेकवेळा धमकी देण्यात आलीय. नुकताच मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर धमकीचा मेसेज आला. जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम त्याच्या कामावर सुद्धा पहायला मिळतोय. सलमान खानने धमकीचे मेसेज आणि कॉल आल्यानंतर काम थांबवलं नाही. यावेळी सुद्धा एका ब्रेकनंतर तो शूटिंग सुरु करेल. आता राम गोपाल वर्मानंतर स्वत:ला फिल्म क्रिटिक म्हणवणाऱ्याने केआरकेने लॉरेन्स बिश्नोईला चित्रपटाची ऑफर दिली आहे.
कमाल आर खानने याआधी सुद्धा सलमान खानवरुन X वर अनेक टि्वट केली आहेत. सलमान खानने केआरके विरुद्ध मानहानीचा खटला सुद्धा दाखल केलाय. केआरकेला कंटेट बनवण्यापासून रोखण्याची मागणी केली. मात्र, तरीही तो सलमान खानबद्दल बोलत असतो. त्याच्याविषयी टि्वट करतो. आता त्याने लॉरेन्स बिश्नोईला चित्रपटाची ऑफर दिली आहे. केआरके बिग बॉसमध्ये होता. यावेळी सलमान खानने त्याला धमकी देऊन बाहेरचा रस्ता दाखवला होता.
‘बिश्नोईची खिल्ली उडवणं महाग पडेल’
केआरकेने X वर टि्वट करताना लिहिलय की, “मी माझा ‘देशद्रोही 2’ चित्रपट लॉरेंस बिश्नोईला ऑफर करतो. कारण तो परफेक्ट हिरोसारखा वाटतो. तो चित्रपटात खरी एक्शन करु शकेल. त्याला काम करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मी विनंती करतो” त्याने HMO इंडियाला टॅग केलं. लोक केआरकेच्या या टि्वटची मजा घेत आहेत. लॉरेंन्स बिश्नोईची खिल्ली उडवणं महाग पडेल असंही काहींनी लिहिलय.
I offer my film #Deshdrohi2 to #LawrenceBishnoi because he looks like a perfect hero. He will look good, when he will do Real action in the film. So I request to @HMOIndia to allow him to work. And I will request to Budhaoo to play villain in the same film. pic.twitter.com/Izzx0YyNN3
— KRK (@kamaalrkhan) October 17, 2024
अजून कोणी लॉरेन्सचा नंबर मागितला?
सलमान खानबद्दल राम गोपाल वर्माने सुद्धा वादग्रस्त टि्वट केलं होतं. त्याची खूप चर्चा झाली. सलमान खानने बिश्नोईला सुपर काऊंटरची धमकी द्यावी असं रामगोपाल वर्माने म्हटलं. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सुद्धा लॉरेन्स बिश्नोईचा नंबर मागितलेला.