अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडला सलमानने दिला होता खास सल्ला, जो तिने ऐकला नाही

अरबाज खानने मलायका सोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसरे लग्न केले आहे. 24 डिसेंबर रोजी त्याने शूरा खानसोबत विवाह केला आहे. शूरासोबत लग्न करण्यापूर्वी अरबाज हा मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीशी रिलेशनशिपमध्ये होता. पण नंतर दोघांचा ब्रेकअप झाला होता. यादरम्यान तिने एका मुलाखतीत यावर भाष्य केले आहे.

अरबाजच्या एक्स गर्लफ्रेंडला सलमानने दिला होता खास सल्ला, जो तिने ऐकला नाही
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 5:53 PM

salman khan and Giorgia Andriani : अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खानने डिसेंबरमध्ये दुसरे लग्न केले आहे. अरबाजने 24 डिसेंबर रोजी शुरा खानसोबत विवाह केला. बहीण अर्पिता खानच्या घरी हा विवाह पार पडला. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थितीत होते. शूरासोबतच्या अरबाजच्या नात्याबद्दल यापूर्वी कोणतीही बातमी पुढे आली नव्हती. लग्नाआधी त्याचे नाव परदेशी मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीशी जोडले जात होते. परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी देखील पुढे आली होती. आता अरबाजच्या लग्नाला एक महिना होत असताना जॉर्जिया एंड्रियानी हिने नवा खुलासा केला आहे.

जॉर्जिया अँड्रियानी झूमला दिलेल्या मुलाखतीत तिच्या ब्रेकअपनंतरच्या कालावधीबद्दल भाष्य केले आहे. अरबाजचे तिने कौतुक केले आणि सांगितले की तो खूप चांगला माणूस आहे. एखाद्याला सोडणे खरोखर सोपे नसते. परंतु पुढे जावे लागते.

सलमान खानने दिला होता खास सल्ला

जॉर्जिया पुढे म्हणाली की, आयुष्याच्या दुसऱ्या अध्यायाकडे वाटचाल करत असताना तिला सलमानने सल्ला दिला होता. मुलाखतीत जॉर्जियाने बॉलीवूड अभिनेत्याकडून चांगला सल्ला घेण्याबाबतही खुलेपणाने भाष्य केले. मात्र, ती कोणाचाही सल्ला घेत नाही, कारण ती तिला जे वाटते तेच ती करते, असे तिने सांगितले.

सलमानकडून मिळालेला एक सल्ला आठवत तिने सांगितले की, सलमानने तिला फ्रिंजेस – फ्रिंज स्टाइल हेअर स्टाइल सोडण्याचा सल्ला दिला होता. पण जॉर्जियाने तो सल्ला ऐकला नाही. तिने तिची हेअर स्टाईल तशीच ठेवली कारण तिला तशीच स्टाईल आवडते.

पहिल्या पत्नीसोबत झाला होता घटस्फोट

अरबाज खानने पहिली पत्नी मलायका अरोरा हिला घटस्फोट दिला होता. मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनी अजूनही विवाह केला नसला तरी दोघे ही लवकरच विवाह करणार असल्याची चर्चा आहे.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 1998 मध्ये विवाह झाला होता. पण मार्च 2016 मध्ये दोघे विभक्त झाले. मे 2017 मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. पण मुलासाठी दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.