खानजादी हिचा थेट सलमान खान याच्यासोबत पंगा, अभिनेत्याचा चढला पारा, थेट..
सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. दुसरीकडे सलमान खान हा बिग बाॅस 17 च्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. नुकताच बिग बाॅस 17 मध्ये विकेंडचा वार हा पार पडताना दिसतोय. बिग बाॅस 17 देखील चांगलेच चर्चेत असून मोठा हंगामा घरात होताना दिसतोय.
मुंबई : बिग बॉस 17 मध्ये आज मोठा धमाका होताना दिसणार आहे. आज विकेंडच्या वारमध्ये सलमान खान याचा पारा हा चांगलाच चढल्याचे बघायला मिळतंय. सलमान खान हा खानजादी हिच्यावर भडकल्याचे दिसतंय. फुल हंगामा आज येणाऱ्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर एक प्रोमोचा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये खानजादी हिच्यावर सलमान खान याचा पारा चढलाय. खानजादी थेट म्हणते की, मला घरी जायचे आहे…सलमान खान थेट म्हणतो मग जा आताच घरी…यानंतर अंकिता ही खानजादीला शांत करताना दिसत आहे.
मुळात म्हणजे जिग्ना बोरा हिला खानजादी म्हणते की, माझ्या तब्येतीबद्दल मजाक नका उडवू. हे ऐकून सलमान खान म्हणतो खानजादी इथे कोणीच तुझ्या तब्येतीबद्दल मजाक उडवत नाहीये…इथे तुच तुझ्या तब्येतीबद्दल सतत बोलत आहे. यावेळी सलमान खान याचे बोलणे ऐकून खानजादी रडत रडत म्हणते की, मला घरी जायचे आहे….
खानजादी हिचे हे बोलणे ऐकून सलमान खान हा चांगलाच भडकतो आणि थेट म्हणतो की, घरी जायचे आहे ना…जा आताच घरी. पुढे प्रोमोमध्ये दिसत आहे की, खानजादी ही जोरजोरात ओरडत आणि रडत आहे. मला घरी जायचे म्हणून…खानजादी हिचे हे वागणे सलमान खान याला अजिबातच आवडले नसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
इतकेच नाही तर खानजादी ही सलमान खान याच्यासमोरच जोरात ओरडताना दिसत आहे. यानंतर अंकिता लोखंडे ही खानजादी हिला सांभाळताना दिसत असून सलमान खान याचा पारा चांगलाच चढला आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावरत तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
खानजादी ही सलमान खान याच्यासमोरच चक्क अशाप्रकारे वागताना दिसत आहे. खानजादी हिला अनेकांनी खडेबोल सुनावण्यास सुरूवात केल्याचे बघायला मिळतंय. खानजादी ही सतत काहीतरी वादात अडकताना दिसत आहे. सलमान खान याने विकेंडच्या वारला विकी जैन याची पोलखोल केल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर काही गंभीर आरोपही करण्यात आले.