Salman Khan | सलमान खान याला ‘गंभीर दुखापत’, फोटो पाहून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण, वाचा काय घडले ते
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. सलमान खान याचा हा बहुचर्चित चित्रपट ठरलाय. सलमान खान याचा याच वर्षी टायगर 3 हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. सलमान खान याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला. श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि बिग बाॅस फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) यांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. मात्र, सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात फार काही यश मिळाले नाही. सलमान खान याच्या अभिनयाचे काैतुक चाहत्यांनी केले.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर सलमान खान याचे लगेचच त्याच्या आगामी टायगर 3 चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटात कतरिना कैफ ही देखील मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान हा ममता बनर्जी यांना भेटण्यासाठी गेला होता. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
नुकताच सलमान खान याने टायगर 3 चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमान खान याचा हा फोटो पाहून त्याचे चाहते चिंतेमध्ये आले आहेत. या फोटोमध्ये सलमान खान याच्या पाठिला मार लागल्याचे दिसत आहेत. डाव्या हाताच्या मागे पाठिला हा मार सलमान खान याला लागला आहे.
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान याला ही दुखापत झालीये. सलमान खान याने शेअर केलेला हा फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट करत सलमान चाहते त्याला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. एका चाहत्याने सलमान खान याच्या फोटोवर कमेंट करत म्हटले की, सर काळजी घ्या.
View this post on Instagram
दुसऱ्याने लिहिले की, सलमान खान तुझी आम्हाला चिंता वाटत आहे, प्लीज काळजी घे. तिसऱ्याने लिहिले की, जखमी टायगर देखील खतरनाक असतो. सलमान खान याच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करून त्याला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला होता.