सलमानची अभिषेक अन् अमिताभ बच्चन यांना गळाभेट; नेटकरी म्हणाले ‘अत्यंत दुर्मिळ क्षण’

निर्माते आनंद पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सलमान खान हा अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना मिठी मारताना दिसला. या अत्यंत दुर्मिळ क्षणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सलमानची अभिषेक अन् अमिताभ बच्चन यांना गळाभेट; नेटकरी म्हणाले 'अत्यंत दुर्मिळ क्षण'
Salman Khan and Abhishek BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 9:20 AM

मुंबई : 22 डिसेंबर 2023 | बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी नुकताच आपला 60वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीतील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका व्हिडीओन सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कारण या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि सलमान खान हे तिघे एकत्र दिसले. हे तिघे फक्त एकत्र दिसलेच नाही तर त्यांनी एकमेकांना मिठीसुद्धा मारली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पापाराझी अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये सलमान स्टेजवर आनंद पंडित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातो. त्याचवेळी पुढे त्याला अमिताभ बच्चन दिसतात. सलमान स्वत:हून पुढे जाऊन त्यांना हस्तांदोलन करतो आणि त्यानंतर मिठी मारतो. हे घडत असतानाच स्टेजवर बाजूला उभा असलेला अभिषेक बच्चन हा निर्माता साजिद नाडियादवालाला मिठी मारतो. त्यानंतर सलमान आणि अभिषेकसुद्धा एकमेकांना मिठी मारून अभिवादन करतात. या व्हिडीओच्या अखेरीस सलमान आणि गायक सोनू निगम हे दोघंसुद्धा एकमेकांना मिठी मारताना दिसतात.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘इथे ऐश्वर्यासुद्धा असती तर बरं झालं असतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘बॉलिवूडमधील दोन मोठे स्टार सलमान – अमिताभ एकत्र आले आहेत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘सलमान आणि अभिषेकला मी पहिल्यांदाच अशी एकमेकांची मिठी मारताना पाहतोय’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे.

निर्माते आनंद पंडित हे ‘चेहरे’, ‘द बिग बुल’, ‘थँक गॉड’ आणि ‘टोटल धमाल’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. गुरुवारी त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त बर्थडे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला काजोल, हृतिक रोशन, कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश असे बरेच कलाकार उपस्थित होते. सलमान आणि अभिषेक यांना एकमेकांची भेट घेताना पाहणं चाहत्यांसाठी फारच दुर्मिळ आहे. कारण जवळपास 25 वर्षांपूर्वी सलमान आणि ऐश्वर्या राय एकमेकांना डेट करत होते. या दोघांच्या नात्याचा शेवट कटू झाला होता. त्यानंतर 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न केलं.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.