सुपरडुपर हिट सिनेमे दिले… शर्टलेसचा ट्रेंड आणला, पण एकही किसिंग सीन दिला नाही; सलमान खानचं हे रहस्य माहीत आहे का?

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सलमान खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सलमान खान याला बाॅलिवूडचा दबंग खान देखील म्हटले जाते. आज सलमान खानचा 58 वा वाढदिवस आहे.

सुपरडुपर हिट सिनेमे दिले... शर्टलेसचा ट्रेंड आणला, पण एकही किसिंग सीन दिला नाही; सलमान खानचं हे रहस्य माहीत आहे का?
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 5:11 PM

मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आज सलमान खान याचा 58 वा वाढदिवस आहे. सकाळपासूनच सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सलमान खान याला वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिल्या जात आहेत. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. सलमान खान कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे.

सलमान खान याने चित्रपटांमध्ये येण्याच्या अगोदरच ठरवले होते की, तो चित्रपटांमध्ये कधीच लिपलॉक करणार नाहीये. त्याचे कारणही स्वत: सलमान खान यानेच सांगितले. मुळात म्हणजे जेंव्हाही चित्रपटामध्ये सलमान खान याचा लिपलॉकचा सीन येतो त्यावेळी कॅमेऱ्याचा अँगल चेंज केला जातो आणि सलमान लिपलॉक करत नाही.

सलमान खान याने त्याच्या करिअरमध्ये कधीच चित्रपटामध्ये लिपलॉक केले नाहीये. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खान हा याबद्दल थेट बोलताना दिसला. सलमान खान म्हणाला की, मी लहान असताना घरी सर्वजण मिळून इंग्रजी चित्रपट बघत असत. मात्र, बऱ्याच वेळा ज्यावेळी चित्रपटामध्ये किसिंगचा सीन येतो, त्यावेळी सर्वजण अवघडायचे.

इंग्रजी चित्रपटातील किसिंग सीनच्या वेळी जी परिस्थिती घरातील सदस्यांची असायची तशी माझ्या चाहत्यांची होऊ नये आणि त्यांना चित्रपट घरातील सर्व सदस्यांसोबत मिळून बघता यावा, यासाठी मी चित्रपटात किसिंग सीन न करण्याचे ठरवले.  माझा चित्रपट घरातील सर्वच सदस्यांना एकसोबत बसून बघता यावा ही माझी इच्छा असते. कोणालाही अवघडलेल्यासारखे वाटू नये.

मी या काही गोष्टी फाॅलो करतो यामुळे माझे चाहते हे माझ्यासोबत आजही जोडलेले आहेत आणि ते माझ्यावर प्रेम करतात. असे बरेच चित्रपट असतात जे तुम्ही तुमच्या कुटुंबियासोबत पाहू शकत नाहीत. तुम्ही ते चित्रपट फक्त तुमच्या मित्रांसोबत किंवा एकटे बघू शकतात. तशा चित्रपटांमध्ये काम नाही करायचे हे मी ठरवे आहे.

मैंने प्यार किया या चित्रटामध्ये भाग्यश्रीसोबत सलमानचा किसिंग सीन होता. राधेमध्ये दिशा पटानीसोबत देखील किसिंग सीन होता. मात्र, यावेळी दिशा हिच्या तोंडावर टेप लावण्यात आला होता. 35 वर्षांपासून सलमान खान हा नो किसिंग सीनची पाॅलिशी ही फाॅलो केली आहे. याचाच खुलासा सलमान खान याच्याकडून करण्यात आला.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.