Lockdown : सलमानची दानत, शूट थांबलं तरीही ‘राधे’च्या क्रू मेंबर्सना पगार
अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ सिनेमाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर देशभरात सध्या लॉकडाऊन आहे (Salman Khan Help). या लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टी आमि टेलिव्हिजन इंडस्ट्री पूर्णपणे बंद आहे. तरीही अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ सिनेमाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.
सलमानने त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत जे 26 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत सिनेमाच्या युनिटमध्ये सहभागी होते.
मेकअप आर्टिस्ट सुभाष कपूर यांनी याबाबत पुष्टीकरण केलं आहे. त्यांनी स्पॉट बॉयला याबाबतमी माहिती दिली. “त्यांनी खूप महान काम केलं आहे. मी मनापासून सलमान खान (Salman Khan Help) यांचे आभार मानतो. सध्याची वेळ अत्यंत कठीण आहे.”
#IndiaFightsCorona @CMOMaharashtra @mybmc @AUThackeray @Iamrahulkanal pic.twitter.com/l9qPAPs88U
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2020
सलमानने नुकतंच सिनेमा इंडस्ट्रीत दररोजच्या वेतनावर अवलंबून असणाऱ्या 25,000 पेक्षाजास्त कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला. ज्यांचे जीवनावर या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.
सलमानच्या घरातून पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु
कोरोना विषाणूमुळे ‘राधे’ सिनेमाची शूटिंग बंद आहे. मात्र, या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सलमानच्या घरुन सुरु आहे. लॉकडाोऊनची घोषणा होताच, सलमानने त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला सुरुवात केली.
या सिनेमाचे दिग्दर्शक प्रभू देवा असून ते चेन्नई येथून सिनेलाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम पाहात आहेत. ‘राधे’ सिनेमात सलमान आणि अभिनेत्री दिशा पटाणी सोबत काम करताना दिसणार (Salman Khan Help) आहे.
संबंधित बातम्या :
Ramayan : रामायण मालिकेने टीआरपीचं गणित बदललं, पुन्हा एकदा इतिहास रचला
देशात आणीबाणी लागू करा, लष्कर बोलावून परिस्थिती नियंत्रणात ठेवा : ऋषी कपूर
माझ्या घराचे रुग्णालयात रुपांतर करा, कोरोना रुग्णांसाठी ‘या’ अभिनेत्याकडून मदतीचा हात
Corona | जे कमावलं, ते भारतीयांमुळेच, अभिनेता कार्तिक आर्यनकडून ‘पीएम फंडाला’ एक कोटी