Salman Khan | सर्वांसमोर सलमानने विकी कौशलला केलं दुर्लक्ष? बॉडीगार्डने थेट केलं बाजूला, पहा Video

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी राग व्यक्त करत आहेत. विकीला सर्वसामान्यांप्रमाणे सलमानपासून दूर ढकललं गेलं, असं काहींनी लिहिलं आहे. तर कतरिनामुळे सलमान आणि विकी यांच्या नात्यात कटुता आल्याचं काहींनी म्हटलंय.

Salman Khan | सर्वांसमोर सलमानने विकी कौशलला केलं दुर्लक्ष? बॉडीगार्डने थेट केलं बाजूला, पहा Video
Salman Khan and Vicky KaushalImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 9:26 AM

अबू धाबी : अभिनेता सलमान खान सध्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी अबू धाबीत आहे. सलमानसोबतच अभिषेक बच्चन, विकी कौशल, फराह खान आणि राजकुमार राव हे कलाकारसुद्धा पुरस्कार सोहळ्यासाठी अबू धाबीला पोहोचले आहेत. हे सर्वजण आयफा पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहेत. नुकतीच या पुरस्कार सोहळ्यासंदर्भात एक पत्रकार परिषद पार पडली. IIFA 2023 च्या पत्रकार परिषदेतील सलमान आणि विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये सलमानने विकीकडे साफ दुर्लक्ष केल्याचं पहायला मिळत आहे. सलमानच्या बॉडीगार्डने ज्याप्रकारे विकीला बाजूला केलं, ते पाहून चाहत्यांनीही राग व्यक्त केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये विकी कौशल सलमानपासून थोडा लांब उभा असल्याचं पहायला मिळत आहे. कारण सलमान त्याच्या बॉडीगार्ड्ससोबत एण्ट्री करत असतो. जसजसा सलमान जवळ येतो, तेव्हा विकी त्याच्याकडे हात पुढे करताना दिसतो. मात्र बॉडीगार्ड्सपैकी एक जण विकीला सलमानपासून दूर ढकलतो. सलमानसुद्धा विकीसमोर त्याचा हात पुढे न करता फक्त त्याच्याकडे पाहून पुढे निघून जातो. यानंतर विकीच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट पहायला मिळतात. तरीसुद्धा तो दुसऱ्यांदा सलमानशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हासुद्धा सलमान त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी राग व्यक्त करत आहेत. विकीला सर्वसामान्यांप्रमाणे सलमानपासून दूर ढकललं गेलं, असं काहींनी लिहिलं आहे. तर कतरिनामुळे सलमान आणि विकी यांच्या नात्यात कटुता आल्याचं काहींनी म्हटलंय. ‘सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे विकीला बाजूला केलं, पण सलमानच्या सुरक्षेचं कारण आपल्याला माहीत आहे’, असं एकाने लिहिलं. ‘विकीला सलमानने किती ॲटीट्यूड दाखवला आहे. हे चांगलं दिसत नाही’, अशीही नाराजी दुसऱ्या युजरने व्यक्त केली.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांचं नातं जगजाहीर होतं. हे दोघं एकमेकांना डेट करत होते, अशी जोरदार चर्चा इंडस्ट्रीत होती. मात्र कतरिनाने विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. सलमान आणि कतरिना लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सलमानने आयफा पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेत दिली. या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सलमान आणि कतरिनाचा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.