Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानानंतर सलमान खानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; म्हणाले ‘त्याचं मन खूप मोठं..’

अभिनेता सलमान खानने सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये तो व्हीलचेअरवर बसलेल्या मतदाराची भेट घेताना दिसतोय. त्याच्या याच कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

मतदानानंतर सलमान खानच्या 'त्या' कृतीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; म्हणाले 'त्याचं मन खूप मोठं..'
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 10:00 AM

राज्यातील पहिल्या चार टप्प्यांपेक्षा सोमवारी मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मतदानाचा उत्साह अधिक होता. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोमवारी मतदान केलं. एकीकडे अभिनेता रणवीर सिंह हा गरोदर पत्नी दीपिका पादुकोणसोबत मतदान करण्यासाठी पोहोचला होता. तर दुसरीकडे बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान त्याच्या कुटुंबीयांसोबत मतदान करण्यासाठी गेला. आणखी एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मतदानाच्या रांगेत उभी असल्याचं पहायला मिळालं. या सर्वांत सोशल मीडियावर एका खास व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. हा व्हिडीओ आहे अभिनेता सलमान खानचा. मतदान करून बाहेर आल्यानंतर सलमानने व्हीलचेअरवर बसलेल्या एका मतदाराची जवळ जाऊन भेट घेतली. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय.

सिनेमॅटोग्राफर नदीम खान हे व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी पोहोचले होते. सलमानने आधी त्यांची भेट घेतली. ‘तुम्ही या देशातील सर्वोत्कृष्ट डीओपी आहात’, असं सलमान त्यांना म्हणताना दिसला. तर आणखी एका व्हिडीओमध्ये तो व्हीलचेअरवर बसलेल्या आणखी एका महिलेची भेट घेताना दिसतोय. सलमानचा हा नम्र स्वभाव पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. ‘सलमान सोन्याच्या मनाचा आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘सलमानचा हाच स्वभाव चाहत्यांची मनं जिंकून घेतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

सोमवारी मतदान करण्यासाठी सलमान मतदान केंद्रावर पोहोचला, तेव्हा त्याच्यासोबत कडक सुरक्षाव्यवस्था होती. एप्रिल महिन्यात सलमानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्ट्समेंट्स’बाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. तेव्हापासून त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘बिग बॉस ओटीटी 3’चं सूत्रसंचालन करणार असल्याचं म्हटलं जातंय. पण सलमानच्या तारखा जुळून न आल्यास त्याच्या जागी दुसऱ्या सेलिब्रिटीची वर्णी लागू शकते. यंदा ईदच्या मुहूर्तावर सलमानचा कोणता नवीन चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. मात्र त्याने पुढच्या वर्षी ईदला आवर्जून चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘सिकंदर’ असं असेल.