सलमान खानचं नाव घेताच असं का म्हणाली एक्स-गर्लफ्रेंड युलिया वंतूर? ‘मी का त्याची आठवण…’
Salman Khan: 'मी का त्याची आठवण...', सलमान खान याचं नाव घेताच एक्स-गर्लफ्रेंड युलिया वंतूरची अशी प्रतिक्रिया... चर्चांना उधाण, युलिया आणि सलमान खान यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Salman Khan: झगमगत्या विश्वात कायम सलमान खान याच्या अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. आतापर्यंत अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. भाईजानच्या नावाची चर्चा अभिनेत्री युलिया वंतूर हिच्यासोबत देखील तुफान रंगली. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. शिवाय युलिया वंतूर हिच्या वाढदिवशी संपूर्ण खान कुटुंब एकत्र जमलं होतं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर अधिकृत वक्तव्य केलं नाही.
दरम्यान, युलिया वंतूर हिला गेल्या महिन्यात एका पुरस्कार सोहळ्यात स्पॉट करण्यात आलं होतं. अभिनेत्रीला पहिल्यानंतर तिला सलमान खान याच्याबद्दल विचारण्यात आलं. विचारण्यात आलेल्या प्रश्नावर युलिया वंतूर हिने असं उत्तर दिलं, ज्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा आणखी रंगू लागल्या.
युलिया वंतूर हिला विचारण्यात आलं, ‘सलमान खान याला मिस करत आहेस का?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘तो माझ्या मनात आहे, मी त्याला मिस का करु…’, अभिनेत्री व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. युलिया वंतूर आणि सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहे. दरम्यान, दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी देखील जोर धरला होता.
कशी झाली यूलिया वंतूर आणि सलमान खान यांची पहिली भेट?
सलमान खान आणि यूलिया वंतूरची पहिली भेट 2010 ला डब्लिनमध्ये झाली होती. त्यानंतर यूलिया एक्स-बॉयफ्रेंडसोबत भारतात आली. पण काही महिन्यांनंतर तिनं प्रियकराशी ब्रेकअप झालं आणि काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती परत आपल्या देशात परतली. 2012 मध्ये सलमान खानच्या सांगण्यावरून ती पुन्हा त्याला भेटायला आली.
सलमान खान याचा आगामी सिनेमा
अभिनेता सलमान खान याच्या आगमी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते कायम असतात. सलमान खान लवकरच ‘सिकंदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदना पहिल्यांदा भाईजान सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.