Salman Khan हातात का घालतो निळा स्टोन, त्याचा काय होतो परिणाम?
सलमान खान याच्या आयुष्यातील लकी निळा स्टोन; सिनेस्टार करिअरमध्ये कठोर परिश्रम करण्यासोबतच आपले नशीब उज्वल करण्यासाठी देखील करतात अनेक उपाय
मुंबई : अभिनेता सलमाान खान बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. भाईजान याने स्वतःची ओळख फक्त सिनेमांच्या माध्यमातून नाही तर, प्रॉडक्शन, कपडे, ज्वलरी… इत्यादी मार्गांनी देखील बनवली आहे. सलमान याला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. भाईजान याने कोणतीही नवीन स्टाईल केली तर, चाहते देखील अभिनेत्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. सलमान याने मोठ्या पडद्यावर विविध भूमिका बजावल्या. अभिनेत्याच्या काही भूमिकांना प्रेक्षकांनी प्रेम दिलं, तर काहींनी मात्र अभिनेत्यावर टीका केली. कौतुक आणि टीकेचा सामना करत अभिनेत्याने यशाचं उच्च शिखर गाठलं.
कौतुक आणि टीकेचा सामना करत असताना अभिनेत्याची साथ फक्त एका गोष्टीने सोडली नाही. सलमान खान याच्या ब्रेसलॅटला असलेला निळा स्टोन कायम अभिनेत्याच्या सोबत असतो. सलमान देखील त्याच्या निळ्या स्टोनचा कायम देखावा करताना दिसतो. अभिनेत्याच्या चांगल्या वाईट काळात निळा स्टोन कायम अभिनेत्याच्या सोबत असतो.
निळा स्टोन अभिनेत्यानं खरेदी केला नसून, त्याला भेटवस्तू म्हणून मिळाला आहे. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने त्याच्या हातातील निळ्या स्टोनबद्दल सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘मला हा स्टोन भेटवस्तू म्हणून मिळाला आहे. स्टोन माझं नकारात्मक गोष्टींपासून रक्षा करतं. माझ्यावर कोणतंही संकट आलं तर, स्टोन माझी रक्षा करतो… माझ्यावर कोणतं संकट येणार असेल तर, स्टोन तुटतो…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
कोणाला विश्वास नसेल पण सलमान खान याचे वडील सलीम खान देखील निळा स्टोन घालतात. पुढे अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा मी माझ्या करियरला सुरुवात केली, तेव्हा वडिलांनी मला निळा स्टोन दिला. या स्टोनचं नाव फिरोजा असं आहे.’ असे म्हणतात की जगात फक्त दोन जिवंत स्टोन आहेत. एक अकीक आणि दुसरा फिरोज.
सलमान फिरोजा नावाचा स्टोन घालतो. या स्टोनचं वैशिष्ट्य म्हणजे, ते घालणाऱ्याला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. माझ्या हातातील हा सातवा स्टोन असल्याचं सलमानने सांगितलं होतं. कोणत्याही ठिकाणी अभिनेत्याच्या हातत हा स्टोन दिसतो.
सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
एवढंच नाही तर, किसी का भाई किसी की जान सिनेमातून अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील झळकणार आहे.