Bigg Boss | तुम्हाला पंजाबची कतरिना माहितीय का? सलमानच्या नजरेत भरली, थेट स्टार बनली

Big Boss | सलमान खान पंजाबच्या मुलीला सतत करायचा फोन, पण तिने भाईजानला केलं ब्लॉक... पण सलमानच्या नजरेत भरल्यानंतर ती थेट स्टार बनली... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पंजाबच्या मुलीची चर्चा...

Bigg Boss | तुम्हाला पंजाबची कतरिना माहितीय का? सलमानच्या नजरेत भरली, थेट स्टार बनली
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 10:39 AM

मुंबई | 27 जानेवारी 2024 : पंजबाची राहणारी एक मुलगी जिला अभिनेता सलमान खान सतत फोन करायचा… पंजाबच्या मुलीसोबत काम करण्याची खुद्द सलमान खान याची इच्छा होती. पण त्या मुलीने मात्र चक्क सलमान खान याचा नंबर ब्लॉक केला. त्या मुलीने सलमान खान याचा नंबर का ब्लॉक केला? अशा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. सलमान खान याचा नंबक सेव्ह नसल्यामुळे त्या मुलीने भाईजानचा नंबर ब्लॉक केला.. असं तिने स्वतः एका शोमध्ये सांगितलं. अनोळखी नंबर असल्यामुळे तिने फार काही लक्ष दिलं नाही. पण तिला माहिती नव्हतं, त्याच नंबरमुळे तिच्या आयुष्यात फार मोठे बदल होणार आहेत.

सलमान खान याने अनेकदा पंजाबच्या मुलीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर दुसऱ्या एका व्यक्ती तू जो नंबर ब्लॉक करत आहेस, तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर, अभिनेता सलमान खान याचा आहे. शेवटी पंजाबच्या मुलीचं सलमान खान याच्यासोबत बोलणं होतं आणि त्या पंजाबच्या मुलीचा प्रवास सुरु होतो.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शहनाज गिल आहे. शहनाज हिने अनेक पंजाबी सिनेमांमध्ये आणि मॉडेल म्हणून काम केलं आहे. आज शहनाज हिचा वाढदिवस आहे. म्हणून सर्वत्र शहनाज आणि तिच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस 13’ मध्ये झळकल्यानंतर शहनाज हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. शोमध्ये सलमान कायम शहनाज हिला पंजाबची कतरिना म्हणून हाक मारायचा. आज देखील अनेक चाहते शहनाज हिला पंजाबची कतरिना म्हणून ओळखतात. शहनाज कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

बिग बॉसमध्ये शहनाज दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं होतं. आज सिद्धार्थ चाहत्यांमध्ये नाही, पण आजही सिद्धार्थ याचे शहनाज हिच्यासोबत असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

शहनाज हिचे सिनेमे

शहनाज हिने सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमानंतर शहनाज हिच्या प्रसिद्धीमध्ये आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 182.44 कोटी रुपयांची कमाई केली. तर गेल्यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘थैंक्यू फॉर कमिंग’ सिनेमात देखील शहनात महत्त्वाची भूमिकेत दिसली. चाहते कायम शहनाज हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.