सलमान खानला मोठा धक्का, जवळच्या व्यक्तीवर रॉड आणि दगडांनी हल्ला
Salman Khan : सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीवर रॉड आणि दगडांनी हल्ला, पोलिसांपर्यंत पोहोचला वाद, व्यक्ती मात्र रुग्णालयात... आता कशी आहे भाईजान याच्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती... सर्वत्र चर्चांना उधाण
मुंबई| 13 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीवर रॉड आणि दगडांनी हल्ला करण्यात आला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. उधारीने दिलेल्या पैशांचा वाद टोकाला पोहोचला आणि भाईजानच्या जवळच्या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली आहे. हल्ल्यात व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली, तो सलमान खान याचा मेकअप आर्टिस्ट आहे. सलमान खान याच्या मेकअप आर्टिस्टं नाव पलेश्वर चव्हाण आहे. पलेश्वर चव्हाण आरोपींना जबर मारहाण केली आहे. एवढंच नाही तर आरोपींविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
पलेश्वर चव्हाण याने बार मॅनेजरला काही पैसे उधार म्हणून दिले होते. बार मॅनेजर सतीश याने काही पैसे पलेश्वर चव्हाण याला परत केले होते. पलेश्वर चव्हाण याने विश्वास ठेवत पुन्हा सतीश याला 3 लाख रुपये दिले होते. पण सतीश 3 लाख पलेश्वर चव्हाण याला पुन्हा देण्यास तयार नव्हता. स्वतःचे पैसे घेण्यासाठी पलेश्वर चव्हाण रात्री 10 बारमध्ये पोहोचला. पण पलेश्वर चव्हाण आणि सतीश यांची भेट झाली नाही.
पलेश्वर चव्हाण याने बारमध्ये चार – पाच तास प्रतीक्षा केली. त्यानंतर बार बंद करण्याची वेळ आल्यानंतर पलेश्वर चव्हाण आणि सतीश यांचे बारबाहेर वाद सुरु झाले. अशात सतीश याने त्याच्या मित्रांना बोलावलं… सतीश याचे मित्र देखील दगडी आणि रॉड घेऊन पोहोचले. या झटापटीत सलमान खान याचा मेकअप आर्टिस्ट पलेश्वर चव्हाण गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पलेश्वर चव्हाण याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पलेश्वर चव्हाण याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सतीश आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संबंधीत प्रकरणाची चर्चा सुरु आहे.
झालेल्या घटनेत सलमान खान याचा मेकअप आर्टिस्ट पलेश्वर चव्हाण गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु असल्याची चर्चा रंगत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संबंधीत प्रकरणाची चर्चा सुरु आहे.