सलमान खानची आई महाराष्ट्रीयन, वडील मुसलमान; भाईजानचे आजोबा शेवटच्या क्षणी म्हणाले…
Salman Khan family : सलमान खानची आई हिंदू, वडील मुसलमान..., लग्नानंतर अभिनेत्याच्या आई नाही चढल्या वडिलांच्या घराची पायरी... वडील शेवटचा श्वास घेत असताना...; 'धर्म स्वीकार करण्यासारखा नाही...', म्हणत सलमा यांच्या वडिलांनी लग्नाला दिला होता नकार...
अभिनेता अरबाज खान याच्या ‘द इनविंसिबल्स’ चॅट शोमध्ये लेखक सलीन खान यांनी कुटुंबातील अनेक रहस्य सांगितलं. सांगायचं झालं तर, सलीम खान यांना कायम हेलन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना पाहिलं आहे. पण यावेळी सलीम खान हेलन यांच्याबद्दल नाहीतर, पहिल्या पत्नी सलमा खान (सुशीला चरक) यांच्याबद्दल बोलताना दिसले. सलीम खान यांनी सुशीला यांच्यासोबत पहिली भेट रिपेशनशिप आणि लग्नाबद्दल सर्वकाही अनेक वर्षानंतर सांगितलं. सलीम खान पंजा लढवण्यात अव्वल होते. तेव्हाच एका मित्राच्या घरी सलमा आणि सलीम यांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघे कायम लपून भेटू लागले. पण असं लपून भेटणं सलीम खान यांना आवडत नव्हतं.
सलीम खान म्हणाले, ‘मला असं लपून लपून भेटयाचं नव्हतं. मी सलमा यांनी सांगितलं मला तुमच्या आई-वडिलांना भेटायचं आहे. तेव्हा मला सलमा यांनी स्पष्ट नकार दिला.’ अशात सलीम खान देखील मागे हटले नाहीत. सलीम खान आणि सलमा खान जवळपास 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
पुढे सलीम खान म्हणाले, ‘असं लपून किती दिवस भेटणार होता. मला बिलकूल आवडत नव्हतं. त्यांच्या घरी गेलो तेव्हा मला वाटलं देशातील सर्व महाराष्ट्रीयन त्यांच्या घरात आहेत. मोठ्या संख्येने कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मी एकटा होतो. मनावर दडपण होतं. सासरे मला म्हणाले तुमच्याबद्दल विचारपूस केली आहे. चांगल्या कुटुंबातील मुलगा आहेस. शिक्षित आहेस.. सर्वकाही आहे… मला काहीही अडचण नाही…’
‘आताच्या काळात तुझ्यासारखे चांगली मुलं भेटणं कठिण आहे. पण धर्म स्वीकार करण्यासारखा नाही… तेव्हा मी सलमा यांच्या वडिलांना म्हणालो, आमच्या 1760 समस्या, अडचणी असतील पण धर्ममुळे कधीच अडचणी येणार नाहीत. खरं तर 1760 अडचणी आल्या पण धर्म कधीच मध्ये आला नाही…’
‘सलमासोबत लग्न होऊ शकत नाही. दुसरी मुलगी बघ, संसार थाट… असं वडिलांचं म्हणणं होतं. त्यानंतर आम्ही रजिस्टर करत लग्न केलं. सलमा यांच्या वडिलांनी आमच्या नात्याला कधीच स्वीकारलं नाही. लग्नाच्या 10 वर्षांपर्यंत कोणी आलं नाही. पण जेव्हा सोहेलचा जन्म झाला, तेव्हा वडील रुग्णालयात आले, मुलीला भेटले आणि निघून गेले…’
‘शेवटी जेव्हा सलमा यांच्यां वडिलांचं निधन होत होतं, तेव्हा ते म्हणाले, ‘मी सर्वकाही माफ करेल पण ते 10 वर्ष मी तुम्हाला भेटलो नाही, याला मी कधीच माफ करु शकत नाही. अखेर ते म्हणाले, तू चांगलं केलंस… माझे आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहेत. आता कायम आनंदी राहा…’ असं देखील सलीम खान म्हणाले.