Salman Khan याने घेतलेल्या निर्णयामुळे ‘या’ सेलिब्रिटीला होणार मोठा फायदा; नक्की काय आहे प्रकरण?
सलमान खान याच्याबद्दल मोठी माहिती समोर; अभिनेत्याने घेतलेल्या निर्णयाचा फायदा नक्की कोणाला होणार? सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा...
मुंबई | अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी २’ शोने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सोमवार ते शुक्रवार स्पर्धकांची भांडणं मैत्री इत्यादी गोष्टी समोर आल्यानंतर प्रेक्षक ‘विकेन्ड का वार’च्या प्रतीक्षेत असतात. कारण ‘विकेन्ड का वार’मध्ये सलमान खान स्पर्धकांसोबत संवाद साधतो आणि स्पर्धकांना स्पष्ट इशारा देखील देतो. ‘बिग बॉस ओटीटी १’ शोमध्ये होस्टची भूमिका करण जोहर याने बजावली होती. पण सलमान खान याची लोकप्रियता पाहून ‘बिग बॉस ओटीटी २’ शोच्या होस्टची जबाबदारी दबंग खान याच्या खांद्यावर होती.
पण आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ‘बिग बॉस ओटीटी २’ शोमध्ये ‘विकेन्ड का वार’ सलमान खान होस्ट करणार नसून एका प्रसिद्ध सेलिब्रिटीवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विनोदवीर आणि अभिनेता कृष्णा अभिषेक ‘विकेन्ड का वार’ होस्ट करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अन्य प्रोजेक्टमुळे सलमान खान यंदाच्या आठवड्यात ‘विकेन्ड का वार’ होस्ट करु शकत नाही. म्हणून कृष्णा अभिषेक त्याच्या विनोदी अंदाजात ‘विकेन्ड का वार’ होस्ट करताना दिसणार आहे. सांगायचं झालं तर, कृष्णा यंदाच्या सीझनमध्ये प्रत्येक आठवड्यात बिग बॉसच्या घरात येवून स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसतो.
As per Source, Salman Khan won’t be available to host this weekend’s episodes owing to his prior commitments.
Krushna Abhishek likely to host weekend episodes from activity area in his usual style.#BiggBoss_Tak #BiggBossOTT2
— #BiggBoss_Tak (@BiggBoss_Tak) July 14, 2023
आता कृष्णा सलमान खान याने दिलेली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस ओटीटी २’ची चर्चा रंगत आहे. कृष्णा याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अशात बिग बॉसचा होस्ट म्हणून प्रेक्षक कृष्णाला किती प्रेम देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे, कृष्णासाठी एक उत्तम संधी आहे.
अभिनेता सलमान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त शो होस्ट करत आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ शोचा होस्ट देखील सलमान खानच आहे. शिवाय प्रेक्षक देखील त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात. आता यंदाच्या आठवड्यात सलमान खान दिसणार नाही अशी चर्चा जोर धरत आहे.
सलमान खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमात अभिनेता शाहरुख खान देखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.