हा कोणाचंच ऐकत.. अरबाजच्या दुसऱ्या लग्नाबाबत अखेर सलमानने सोडलं मौन

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये अरबाज खान आणि सोहैल खान यांनीही हजेरी लावली होती. यावेळी कॉमेडियन भारती सिंहने अरबाजच्या दुसऱ्या लग्नावरून सलमानला प्रश्न विचारला. त्यावर सलमानने आपल्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. सलमानचं हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा कोणाचंच ऐकत.. अरबाजच्या दुसऱ्या लग्नाबाबत अखेर सलमानने सोडलं मौन
सलमान खान, अरबाज खान आणि शुराImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 11:18 AM

मुंबई : 29 जानेवारी 2024 | तब्बल 108 दिवसांनंतर ‘बिग बॉस 17’ या लोकप्रिय शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने बिग बॉसची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये आपल्या नावे केले. रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ग्रँड फिनालेला सुरुवात झाली होती. विविध सेलिब्रिटींनी या फिनालेला हजेरी लावली होती. तर कॉमेडियन भारती सिंह आणि कृष्णा अभिषेक यांनी स्पर्धकांसह सूत्रसंचालक सलमान खान आणि स्टेजवर आलेल्या पाहुण्यांनाही पोट धरून हसवलं. ग्रँड फिनालेमध्ये सलमानचे दोघंही भाऊ अर्थात सोहैल खान आणि अरबाज खानसुद्धा उपस्थित होते. हे दोघं स्टेजवर पोहोचताच भारतीने आपल्याच अंदाजात त्यांची मस्करी केली. काही दिवसांपूर्वीच अरबाज खानने दुसरं लग्न केलं. यावरूनच भारतीने अरबाजची टेर खेचली.

भारतीने अरबाजच्या लग्नाला न बोलावल्यावरून मस्करी करण्यास सुरूवात केली. त्यावर उत्तर देत अरबाज म्हणाला, “काही नाही, पुढच्या लग्नात बोलावून घेऊ.. हा पण कोणा दुसऱ्याच्या..” यानंतर भारती पुन्हा सलमानला अरबाजच्या लग्नाविषयी प्रश्न विचारते. ती म्हणते, “मोठा भाऊ असल्याच्या नात्याने तू लग्नाबद्दल त्याला कोणता सल्ला दिला नाहीस का?” भारतीच्या या प्रश्नाचं उत्तर सलमान आपल्याच अंदाजात देतो. “अरबाज कोणाचंच ऐकत नाही, जर ऐकत असता तर..” असं तो म्हणतो.

हे सुद्धा वाचा

अरबाजने डिसेंबर महिन्यात मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी लग्न केलं होतं. या लग्नाला अरबाजचे आईवडील सलीम आणि सलमा खान, सावत्र आई हेलन, भाऊ सलमान खान, सोहैल खान, सोहैलची मुलं निर्वाण आणि योहान, बहीण अरविरा खान हे सर्वजण उपस्थित होते. शुरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असून तिचे 13.2 हजार फॉलोअर्स आहेत. शुराने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलंय. अरबाज आणि शुराची पहिली भेट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली.

56 वर्षीय अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. मात्र लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर अरबाज आणि मलायकाने 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2017 मध्ये दोघं विभक्त झाले. 1998 मध्ये अरबाज आणि मलायकाने लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. अरबाज आणि मलायाकाचा मुलगा अरहान खान हा आता 21 वर्षांचा आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.