शाहरुख की सलमान.. कोणाकडे सर्वाधिक पैसा? अजय देवगणचा खुलासा

अभिनेता अजय देवगणने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी अजयने करणच्या विविध प्रश्नांची मजेशीर उत्तरं दिली. करणने जेव्हा शाहरुख आणि सलमानविषयी प्रश्न विचारला, तेव्हा अजयने अत्यंत चलाखीने उत्तर दिलं.

शाहरुख की सलमान.. कोणाकडे सर्वाधिक पैसा? अजय देवगणचा खुलासा
Ajay, Salman and Shah RukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 8:22 PM

मुंबई : 22 डिसेंबर 2023 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोचा आठवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट, करीना कपूर, आदित्य रॉय कपूर, काजोल, राणी मुखर्जी यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगण आणि निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी या दोघांनी करणसोबत खूप गप्पा मारल्या. करणने नेहमीच शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटींनी रंजक आणि तितकेच मसालेदार प्रश्न विचारले. या एपिसोडमध्ये करणने मात्र अजयला असा प्रश्न विचारला, जे ऐकून ‘सिंघम’सुद्धा थोडा संभ्रमात पडला.

करण जोहरच्या या शोमध्ये अजय आणि करणने खूप मजामस्करी केली. रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने अजयला विचारलं की शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांपैकी कोणावर अधिक विश्वास केला जातो. या प्रश्नाचं उत्तर अजयने अत्यंत चलाखीने दिलं. बँक बॅलेन्सच्या हिशोबाने मला असा वाटतं की शाहरुख खानकडे जास्त आहे, असं तो म्हणतो. अजयचं हे उत्तर ऐकून करणसुद्धा होकार देत म्हणतो, “हो, खासकरून यावर्षी.” 2023 या वर्षभरात आतापर्यंत शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर ‘जवान’ आणि आता गुरुवारी ‘डंकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पठाण आणि जवानने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. हे दोन्ही चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांपैकी आहेत. तर ‘डंकी’ने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. डंकीची कमाई ही पठाण आणि जवानच्या तुलनेत कमी आहे. तर दुसरीकडे सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. मात्र ‘टायगर 3’ने समाधानकारक कमाई केली.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.