Bollywood | ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीला धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याची इच्छा; एकेकाळी होती सलमान खानची गर्लफ्रेंड
Bollywood | 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री होती सलमान खान याची गर्लफ्रेंड... आता तिली सनी देओल यांच्यासोबत नाही तर, धर्मेंद्र यांच्यासोबत करायचं आहे काम, कोण आहे ती? सध्या सर्वत्र भाईजानच्या एक्स-गर्लेफ्रेंडची चर्चा...
मुंबई : 16 सप्टेंबर 2023 | अभिनेता सलमान खान याच्या गर्लफ्रेंडची यादी फार मोठी आहे. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना भाईजान याने डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. वयाच्या 57 व्या वर्षी देखील सलमान खान एकटाचं आहे. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खान याच्या नावाची चर्चा रंगली. आज अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत, पण तरी देखील सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा मात्र आजही चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. फक्त बॉलिवूड अभिनेत्रीच नाही तर, सलमान खान याने एका पाकिस्तानी गर्लफ्रेंडला देखील डेट केलं आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, त्या अभिनेत्रीचे आई – वडील भारतीय आहेत. पण फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानात गेले. म्हणजे सलमान खान याच्या एक्स-गर्लफ्रेंडची ओळख पाकिस्तानी अभिनेत्री अशी आहे. तिने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोमी अली आहे. सोमी अली आता अभिनयापासून दूर आहे. पण नुकताच सोमी हिने ‘गदर २’ सिनेमाबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. ‘गदर २’ पाहण्यासाठी अभिनेत्री उत्सुक आहे. सोमी अलीने सांगितलं की, ज्या कथे भोवती सिनेमा फिरत आहे, तो विषय सोमी हिच्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण तिचे आई-वडीलही भारतात जन्मले होते पण फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानात गेले.
पुढे सोमी अली म्हणाली, ‘सनी देओल यांच्यासोबत मला काम करायचं होतं.’ पण धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तिने अभिनेत्यासोबत उर्दूमध्ये अनेक पाकिस्तानी विषयांवर गप्पा मारल्या… आता अभिनेत्रीच्या मनातील ‘गदर २’ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सोमी अलीने गदर 2 बद्दल म्हणाली, ‘दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये खोल अर्थ दडलेला आहे. प्रेमाला कोणतीही सीमा नसते. दोन्ही देशांतील लोकांना पहिल्यापासून एकत्र राहायचे आहे. ईद आणि दिवाळी ते एकत्र साजरा करायचा आहे. ‘गदर २’ सिनेमा हाच संदेश देतो… पण राजकारणी व्यक्तींमुळे तणावाचं वातावरण निर्माण होतं असं देखील अभिनेत्री म्हणाली..
सोमी अली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता एका एनजीओसाठी काम करते. सोमी अली आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, अभिनेत्री तिच्या भूतकाळामुळे आणि सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे कायम चर्चेत असते…